वाशीगांव, शिरवणे, जुईनगर विभागात 875 नागरिकांचे कोव्हीड-19 मास स्क्रिनींग
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध विभागांमध्ये कोव्हीड 19 विशेष तपासणी शिबीरांचे आयोजन करून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न केले जात आहेत. या अनुषंगाने आज वाशीगांव, शिरवणे, जुईनगर येथे आयोजित शिबीरांमध्ये 875 नागरिकांचे मास स्क्रिनींग करण्यात आले.
यामध्ये वाशीगांव येथे वाशी नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तेरणा रुग्णालयाच्या वैद्यकीय समुहाने 591 नागरिकांचे मास स्क्रिनींग केले व त्यामध्ये कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या 14 व्यक्तींचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले.
त्याचप्रमाणे शिरवणे येथे शिरवणे नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तेरणा रुग्णालयाच्या वैद्यकीय समुहाने 135 व्यक्तींचे मास स्क्रिनींग केले व कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या 03 व्यक्तींचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले.
तसेच जुईनगर येथे शिरवणे नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तेरणा रुग्णालयाच्या वैद्यकीय समुहाने 149 व्यक्तींचे मास स्क्रिनींग केले व कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या 06 व्यक्तींचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले.
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मास्कचा नियमित वापर करण्याची खबरदारी घ्यावी तसेच सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 17-06-2020 14:00:30,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update