कालपासून सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी महापालिका मुख्यालयातील तात्काळ कृती केंद्रामध्ये जाऊन पावसाची सद्यस्थिती जाणून घेतली व महापालिका क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. याप्रसंगी त्यांच्या समवेत शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील व आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार उपस्थित होते.
हवामान खात्यामार्फत दि. 3 जुलै रोजी प्राप्त झालेल्या इ मेल नुसार ठाणे जिल्हा व कोकणात दोन दिवस पाऊस असेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. या अनुषंगाने आयुक्तांनी कालच सर्व विभाग कार्यालयांना सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आठही विभाग कार्यालये तसेच पाचही अग्निशमन केंद्रे येथील मदत पथके सज्ज होती. काल दि. 3 जुलैपासून आज दुपारी 3.30 वा. पर्यंत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 192.7 मिमी पावसाची नोंद झाली असून झाडे / मोठ्या फांद्या पडल्याच्या 8 घटनांची नोंद झालेली आहे.
आज 4 जुलै रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 3.30 वा. पर्यंतच्या पावसाचा तपशील -
बेलापूर :- 93.60 मिमी
नेरूळ :- 104.00 मिमी
वाशी :- 67.00 मिमी
कोपरखैरणे :- 81.90 मिमी
ऐरोली :- 101.30 मिमी
सरासरी पर्जन्यवृष्टी - 89.56 मिमी
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात तात्काळ कृ्ती केंद्र 24 x 7 कार्यान्वित असून नागरिकांसाठी 1800222309 / 1800222310 हे 2 टोल फ्री क्रमांक विनामूल्य उपलब्ध आहेत तसेच 5 अग्निशमन केंद्रातही यंत्रणा सुसज्ज असून आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. त्यासोबतच आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व आठही विभाग कार्यालयात विभागीय नियंत्रण कक्ष 24 x 7 कार्यरत आहेत.