मास्क, सोशल डिस्टन्सींग यांचे पालन न करणाऱ्यांकडून 1 लक्ष 41 हजार दंड वसूल

कोरोनाची संसर्गातून प्रसारित होणारी साखळी खंडित करण्यासाठी 3 जुलै मध्यरात्री पासून 13 जुलै मध्यरात्रीपर्यंत महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी आपापल्या घरातच थांबून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखावा असे आवाहन करण्यात आले आहे. तथापि काही नागरिक अत्यावश्यक कामांशिवाय तसेच लॉकडाऊनच्या नियमांचे पालन न करता घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे महापालिका व पोलीस प्रशासनावर ताण वाढत असून अशा प्रकारे लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करुन सामाजिक आरोग्याला धोका पोहचविणाऱ्या नागरिकांकडून दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येत आहे. महानगरपालिका विभाग कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त आणि संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत आहे.
मास्कचा वापर न करणे, सार्वजनिक ठिकाणी एकमेकांमध्ये पुरेसे सामाजिक अंतर न राखणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अशा सामाजिक आरोग्याला बाधा पोहचविणाऱ्या नागरिक, दुकानदार व आस्थापना यांच्याकडून दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येत असून 9 जुलै रोजी अशा प्रकारे 1 लक्ष 41 हजार इतक्या रक्कमेचा दंड वसूल करण्यात आला आहे.
यामध्ये - बेलापूर विभाग कार्यालय क्षेत्रात रु. 39 हजार
नेरुळ विभाग कार्यालय क्षेत्रात रु. 7 हजार
वाशी विभाग कार्यालय क्षेत्रात रु. 4 हजार
तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रात रु. 10 हजार
कोपरखैरणे विभाग कार्यालय क्षेत्रात रु. 2 हजार
घणसोली विभाग कार्यालय क्षेत्रात रु. 38 हजार 500
ऐरोली विभाग कार्यालय क्षेत्रात रु. 38 हजार 500
दिघा विभाग कार्यालय क्षेत्रात रु. 2 हजार
अशा रितीने 9 जुलै 2020 रोजी 8 विभाग कार्यालय क्षेत्रात एकूण रु. 1 लाख 41 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी आपल्या घरातच थांबावे, अत्यावश्यक कामासाठी घरातील एकाच माणसाने मास्क् परिधान करुन घराबाहेर पडावे व काम झाल्यावर लगेच घरी परतावे. घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे व आपले हात साबण आणि पाण्याने नियमीतपणे स्वच्छ धुवावेत. कोरोनापासून दूर राहण्यासाठी या महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे महत्वाचे असून नागरिकांनी स्वत:च्या व आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्य् रक्षणासाठी काळजी घ्यावी आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनचे पालन करावे व घरातच थांबावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 10-07-2020 14:09:40,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update