नवी मुंबई महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांचे माध्यमिक शालांत (एस.एस.सी.) परीक्षेत उज्ज्वल यश
माध्यमिक शालांत (एस.एस.सी.) परीक्षा 2020 चा निकाल जाहीर झाला असून नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उज्वल यश मिळविलेले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 18 माध्यमिक शाळांमधून 2198 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 2096 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांचा एकूण सरासरी निकाल 95.36 टक्के एवढा लागला आहे. महानगरपालिकेच्या 18 माध्यमिक शाळांधून 5 शाळांचा निकाल 100 टक्के आहे. गतवर्षीच्या सरासरी निकालात यावर्षी 27.03 टक्के एवढी वाढ झाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमधून शाळा क्र. 106, सेक्टर-5 कोपरखैरणे येथील कु. नेहा गौरीशंकर झा ही विद्यार्थीनी 94.40 टक्के गुण मिळवून सर्वप्रथम आणि कु. संजना प्रल्हाद राठोड ही विद्यार्थीनी 93.80 टक्के गुण मिळवून द्वितीय आणि शाळा क्र. 114, सेक्टर-7 कोपरखैरणे आणि शाळा क्र. 118, पावणेगांव येथील विद्यार्थी अनुक्रमे कु. पौर्णिमा शिवाजी सणस आणि कु. शुभम नारायण मोरे यांनी 93.20 टक्के गुण मिळवून संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळविला आहे.
मा. आयुक्त, श्री अभिजीत बांगर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणा-या मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीकरीता मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत एस.एस.सी. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक सुविधा व शैक्षणिक दर्जा याबाबत पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Published on : 29-07-2020 17:15:22,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update