टाटा उद्योगसमुहाच्या वतीने 1 कोटी 77 लक्ष रक्कमेची वैद्यकीय सुरक्षा साधने प्रदान
कोव्हीड 19 विरोधातील लढाईत विविध सामाजिक संस्था, उद्योगसमुह यांची स्वयंस्फुर्तीने मदत नवी मुंबई महानागरपालिकेस लाभत असून आज टाटा इंटरनॅशनल लिमी. यांच्या सी.आर.निधीतून 1 कोटी 77 लक्ष रक्कमेची वैद्यकीय सुरक्षा साधने देण्यात आली आहेत.
यामध्ये 10 हजार 500 नग एन 95 मास्क, 10 हजार सर्जिकल मास्क, 10 हजार 80 पीपीई किट्स, 2 हजार मेडिकल गॉगल्स, 2 हजार हॅन्डग्लोव्हज, 7 हजार शू कव्हर अशी विविध सुरक्षा साधने देण्यात आली आहेत.
सदर सुरक्षा साधनांचा उपयोग कोव्हीड योध्द्यांना मोठ्या प्रमाणावर होणार असून टाटा उद्योगसमुहाने सामाजिक बंधिलकी जपण्याच्या उद्देशाने केलेल्या या मदतीबद्दल महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
Published on : 08-08-2020 17:36:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update