नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये 967 गौरींसह 8177 श्रीगणेशमूर्तींना भक्तीपूर्ण निरोप पर्यावरणशीलता व कोव्हीड 19 काळात स्वयंशिस्त जपत कृत्रिम विसर्जन तलावांना नागरिकांची प्राधान्याने पसंती
गौरींच्या आगमनानंतर वेगळ्या उत्साहात साजरा होणारा श्रीगणेशोत्सव यावर्षी कोरोना काळातही भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मिरवणूका, गर्दी टाळत साधेपणाने अत्यंत श्रध्देने भाविकांनी गौरींसह गणेशमूर्ती विसर्जन केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व विभागांत तयार करण्यात आलेल्या 135 कृत्रिम तलावांना नागरिकांनी विसर्जनासाठी पसंती दिल्याचे दिसून आले. यामधून कोव्हीड काळातील स्वयंशिस्त तर राखली गेलीच शिवाय पर्यावरण संरक्षणाचीही जाणीव दिसून आली.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 8177 श्रीगणेशमूर्तींचे व 967 गौरींचे विसर्जन संपन्न झाले. यामध्ये पारंपारिक 22 विसर्जन स्थळांवर 3682 घरगुती व 46 सार्वजनिक अशा 3278 श्रीगणेशमूर्तींचे आणि 352 गौरींचे विसर्जन करण्यात आले. तसेच 135 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 4423 घरगुती व 28 सार्वजनिक अशा 4451 श्रीगणेशमूर्तींचे आणि 615 गौरींचे विसर्जन करण्यात आले.
मुख्य 22 विसर्जन स्थळांमधील -
बेलापूर विभागात 5 विसर्जन स्थळांवर 742 घरगुती, 3 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 83 गौरी,
नेरूळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 1083 घरगुती श्रीगणेशमूर्ती व 146 गौरी,
वाशी विभागात 2 विसर्जन स्थळांवर 289 घरगुती श्रीगणेशमूर्ती व 10 गौरी,
तुर्भे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 379 घरगुती, 06 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 33 गौरी,
कोपरखैरणे विभागात 2 विसर्जनस्थळांवर 84 घरगुती, 18 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 3 गौरी,
घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 879 घरगुती, 18 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 56 गौरी,
ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 226 घरगुती, 1सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 21 गौरी,
अशाप्रमाणे एकूण 21 विसर्जन स्थळांवर 4088 घरगुती व 34 सार्वजनिक अशा एकूण 4122 श्री गणेश मुर्तींचे व 399 गौरींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले.
त्याचप्रमाणे, यावर्षी मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आलेल्या 135 कृत्रिम विसर्जन स्थळांवर,
बेलापूर विभागात – 15 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 250 घरगुती, 1 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 39 गौरी,
नेरूळ विभागात – 27 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 354 घरगुती श्रीगणेशमूर्ती व 37 गौरी,
वाशी विभागात – 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 251 घरगुती, 4 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 68 गौरी,
तुर्भे विभागात – 17 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 290 घरगुती, 1 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 30 गौरी,
कोपरखैरणे विभागात – 14 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 1408 घरगुती श्रीगणेशमूर्ती व 317 गौरी,
घणसोली विभागात - 17 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 746 घरगुती, 17 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 65 गौरी,
ऐरोली विभागात – 22 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 675 घरगुती, 4 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 31 गौरी,
दिघा विभागात – 7 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 449 घरगुती, 1 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 28 गौरी,
अशा तात्पुरत्या स्वरूपात निर्मिती करण्यात आलेल्या एकूण 135 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 4423 घरगुती व
28 सार्वजनिक अशा एकूण 4023 श्रीगणेशमुर्तींना व 615 गौरींना भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले.
विशेष म्हणजे दिघा विभागातील मुख्य विसर्जन स्थळावर एकाही मूर्तीचे विसर्जन न करता भाविकांनी 7 कृत्रिम तलावांमध्येच श्रीगणेशमूर्ती व गौरी विसर्जन केले. त्याचप्रमाणे कोपरखैरणे विभागात परंपरागत मुख्य विसर्जन स्थळांवर 102 श्रीगणेशमूर्तींचे तसेच 03 गौरींचे तर कृत्रिम विसर्जन स्थळांवर 1408 श्रीगणेशमूर्तींचे व 317 गौरींचे विसर्जन करण्यात आले. दिघा व कौपरखैरणे प्रमाणेच इतरही विभागांमध्ये कृत्रिम विसर्जन स्थळांना नागरिकांनी प्राधान्याने पसंती दिली.
श्रीगणेशोत्सवात गौरींसह विसर्जित होणा-या मोठ्या प्रमाणावरील श्रीगणेशमूर्तींची संख्या लक्षात घेऊन 22 मुख्य विसर्जन स्थळे तसेच 135 कृत्रिम विसर्जन स्थळे येथे भाविकांची कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही अशाप्रकारे व्यवस्था पुरविण्याकडे काटेकोर लक्ष पुरविण्यात आले होते. दोन्ही परिमंडळाचे उपआयुक्त यांच्या नियंत्रणाखाली आठही विभाग कार्यालयांचे सहा. आयुक्त तसेच अधिकारी, कर्मचारी आणि अग्निशमन विभाग आणि विसर्जनासाठी नियुक्त केलेले स्वयंसेवक, लाईफ गार्डस् यांच्या माध्यमातून विसर्जन व्यवस्था सुरळीतपणे पार पडली. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी दक्षतेने कार्यरत होते.
बहुतांशी भाविक यापूर्वी आवाहन केल्याप्रमाणे घरीच श्रींची निरोपाची आरती करून कमी माणसांसह विसर्जन स्थळांवर येत होते. महानगरपालिकेमार्फत सर्व ठिकाणी त्याकरिता टेबलची मांडणी करण्यात आली होती. विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचार वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. विसर्जनस्थळांवर श्रीमुर्तींसोबत आणले जाणारे पुष्पमाळा, फुले, दुर्वा, शमी यासारखे “ओले निर्माल्य” तसेच मुर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान, प्लास्टिक असे “सुके निर्माल्य” स्वतंत्र कलशात टाकावे, कोणत्याही परिस्थितीत या वस्तू पाण्यात टाकू नयेत अशा महानगरपालिकेमार्फत करण्यात येणा-या आवाहनाला भाविकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या निर्माल्याची वाहतुक करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली असून हे निर्माल्य महानगरपालिकेच्या तुर्भे प्रकल्पस्थळी विशेष वाहनाव्दारे वाहून नेले जात आहे व त्याचे पावित्र्य जपत त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.
श्रीगणेशमुर्ती विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न होण्यासाठी सर्वच 22 विसर्जन स्थळांवर तसेच 135 कृत्रिम विसर्जन स्थळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्यात आल्या असून यापुढील काळातील विसर्जन सोहळ्यासाठी नागरिकांनी अशाच प्रकारे सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 28-08-2020 16:44:22,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update