स्वच्छताविषयक कल्पकतेला वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे 'स्वच्छ सर्वेक्षण 2021' मध्ये आयोजन
'निश्चय केला - नंबर पहिला' हे ध्येय नजरेसमोर ठेवून 'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत होणाऱ्या 'स्वच्छ सर्वेक्षण - 2021' ला सामोरे जात असताना नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वच्छता ही नागरिकांची सवय व्हावी याकरिता नागरिकांच्या वर्तणुकीमध्ये बदल घडविण्याकरिता माहिती, शिक्षण, प्रसार व जनजागृती अंतर्गत विविध कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत.
यामध्ये चित्रकला, जिंगल, लघुपट, भित्तीचित्र (म्युरल्स), पथनाट्य अशा प्रकारच्या अभिनव स्पर्धांतून नागरिकांच्या कल्पकतेला वाव देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे व यामधून स्वच्छता संदेश प्रसारित करण्यात येत आहे. या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांना स्वच्छता विषयक उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. अशा विविध उपक्रमांत सातत्य ठेवून रहिवाशांच्या सवयीत बदल घडविण्याच्या दृष्टीने आणि सध्याच्या कोविड-19 साथीच्या आजाराच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्याच्या दृष्टीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.
* चित्रकला / जिंगल / लघुपट / भित्तीचित्र (म्युरल्स) / पथनाट्य
नोंदणी स्विकृतीची अंतिम तारीख - दि. 25 नोव्हेंबर 2020 रोजी संध्या. 5 वा. पर्यंत.
* चित्रकला : दि. 28/11/2020, वेळ: सकाळी 7:30 ते 8:30,
स्थळ: वंडर्स पार्क नेरुळ (पूर्व).
चित्रकलेसाठी लागणारे कागद स्पर्धास्थळी पुरवण्यात येतील.
कलाकारांनी आपले रंग स्वतः आणायचे आहेत.
चित्रकलेसाठी स्पर्धकांना 1 तासाचा वेळ देण्यात येईल.
संपर्क :- 9930305116
* भित्तीचित्रे / म्युरल्स :- दि. 28/ 11 / 2020, वेळ: सकाळी 9.00 ते 11.30.
स्थळ: वाशी, सेक्टर-16 ए येथील मुख्य रस्त्यासमोर असलेल्या नाला पार्किंग लगत असलेली भिंत.
भित्तीचित्रांसाठी रंग व इतर सामग्री स्पर्धकांनी स्वतः आणावी.
भित्तीचित्रे रेखाटण्यासाठी 2 × 2 अशी जागा देण्यात येईल.
भित्तीचित्र स्पर्धेसाठी देण्यात येणारा अवधी अडीच तास इतका असणार आहे.
संपर्क:-9223440454
* जिंगल :- समूहाने आपली प्रस्तुती ऑडिओ / व्हिडीओ माध्यमातून दिलेल्या अवधीत १ मिनिटांत सादर करावी.
समुह संख्या 4 मर्यादित.
जिंगल डीव्हीडी या स्वरूपात (2 Copies) दिनांक 25/11/2020 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत
महानगरपालिकेत जमा करावी.
शब्द आणि संगीत संयोजन सामाजिक भान जपणारे हवेत.
संपर्क :- घनकचरा व्यवस्थापन विभाग / स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष, महानगरपालिका मुख्यालय,
3 रा मजला, महापालिका मुख्यालय, सी.बी.डी. बेलापूर येथे जमा कराव्यात.
मो. क्र. -9223440454
* लघुपट :- लघुपटाचे प्रस्तुतीकरण 2 मिनिटांत करावयाचे आहे.
त्याचबरोबर चित्रीकरण हे कोव्हिड नियमांचे पालन करून करावयाचे आहे.
2 मिनिटांपेक्षा अधिक असलेले लघुपट स्पर्धेत सहभागी केले जाणार नाहीत.
लघुपट डीव्हीडी स्वरूपात (2 Copies) दिनांक 25/11/2020 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत महानगरपालिकेत
जमा करायचे आहेत.
लघुपटाच्या डिव्हीडी घनकचरा व्यवस्थापन विभाग / स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष, महानगरपालिका
मुख्यालय, 3 रा मजला, सी.बी.डी. बेलापूर येथे जमा कराव्यात.
मो..क्र. - 9930305116
* पथनाट्य :- पथनाट्य समूहात किमान 5 आणि कमाल 8 असे स्पर्धक असू शकतील.
सादरीकरणात कुठल्याही राजकीय,धार्मिक, हिंसक किंवा अभद्र शब्दांचा वापर नसावा.
स्पर्धकांनी दिलेल्या विषयांवर व वेळेत आपली प्रस्तुती द्यावी.
परीक्षक व आयोजकांचे निर्णय अंतिम राहील.
प्राथमिक फेरी दि. 27/11/2020 वेळ: सकाळी 9 ते सायं. 7 वाजेपर्यंत
अंतिम फेरी दि. 28/11/2020 वेळ: दुपारी 3 ते सायं. 6 वाजेपर्यंत
स्थळ: विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी.
नोंदणीची अंतिम तारीख 25/11/2020.
संपर्क :- 9152199255 / 9664157165
या पाचही स्पर्धांविषयीच्या अधिक माहितीसाठी महापालिका मुख्यालयातील संपर्क क्र. - 27567388
या स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्यांना प्रशस्तीपत्र व विजेत्यांना आकर्षक बक्षिस देण्यात येईल.
सदर स्वच्छता स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान व स्वच्छ नवी मुंबई मिशन यशस्वीपणे राबविण्यास आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 20-11-2020 12:05:41,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update