संविधान दिनी महापालिका मुख्यालयात उद्देशिकेचे सामुहिक वाचन

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले.
याप्रसंगी शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा परीक्षक श्री. दयानंद निमकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, शिक्षण विभागाचे उप आयुक्त श्री. योगेश कडुस्कर, परवाना विभागाचे उप आयुक्त डॉ. श्रीराम पवार, समाजविकास विभागाच्या उप आयुक्त श्रीम. क्रांती पाटील, कार्यकारी अभियंता श्री. सुनिल लाड, प्रशासकिय अधिकारी श्री. महेंद्र सप्रे, लेखाधिकारी श्री. विजय रांजणे, श्री. मारुती राठोड तसेच अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. तसेच 26/11 च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले भारतीय जवान, पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
Published on : 26-11-2020 10:14:26,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update