विनापरवानगी जाहिराती / होर्डिंग्ज / बॅनर्स / पोस्टर्स बाबत सूचना
अनधिकृत बॅनर्स / पोस्टर्स तसेच होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे निर्देश मा.उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. 155/2011 याबाबत दिले असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये विनापरवानगी बॅनर्स / पोस्टर्स तसेच होर्डिंग्ज लावून व भिंती रंगवून जाहिराती करु नयेत, तसेच झाडावर कोणत्याही जाहिराती लावून त्यांना इजा पोहचवू नये असे सर्व नागरिक / संस्था / मंडळे यांना सूचित करण्यात येत आहे. याचे उल्लंघन करणा-या संबधितांवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदयांतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावयाची आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये विनापरवानगी जाहिराती / होर्डिंग्ज / बॅनर्स / पोस्टर्स आढळल्यास त्याची माहिती नागरिकांनी महापालिकेस देण्यासाठी पुढील प्रमाणे टोल फ्री नंबर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
विभाग कार्यालयचे नाव
|
नोडल ऑफिसर तथा विभाग अधिकारी
|
टोल फ्री क्रमांक
|
बेलापुर
|
श्री.शशिकांत तांडेल
|
1800 222 312
|
नेरुळ
|
श्री.दत्तात्रय नागरे
|
1800 222 313
|
वाशी
|
श्री.महेश हंशशेट्टी
|
1800 222 315
|
तुर्भे
|
श्री.सुबोध ठाणेकर
|
1800 222 314
|
कोपरखैरणे
|
श्री.अशोक मढवी
|
1800 222 316
|
घणसोली
|
श्री.महेंद्रसिंग ठोके
|
1800 222 317
|
ऐरोली
|
श्रीम.मंगला माळवे
|
1800 222 318
|
दिघा
|
श्रीम.प्रियंका काळसेकर
|
1800 222 319
|
मुख्यालय
|
---
|
1800 222 309
1800 222 310
|
तरी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सूज्ञ व जागरुक नागरिक यांना विनापरवानगी जाहिराती / होर्डिंग्ज / बॅनर्स / पोस्टर्स आढळल्यास त्याची माहिती व छायाचित्रे 8422955912 या मोबाईल क्रमांकावर WhatsApp व्दारे पाठवावीत असे आवाहन आहे. शहर स्वच्छतेमध्ये नागरिकांचे नेहमीच सक्रीय योगदान राहिले आहे ते शहर विद्रुपीकरणाला प्रतिबंध करणा-या या कामीही लाभावे असे आवाहन आहे.
Published on : 22-12-2020 13:23:23,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update