क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शिक्षण विभागामार्फत महिला शिक्षण दिन साजरा
नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांची जयंती ''महिला शिक्षण दिन'' म्हणून उत्साहाने साजरी करण्यात आली. यानिमित्त महापालिका मुख्यालयात शिक्षण विभागामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी 'सावित्रीबाई फुले आणि महिलांचा शिक्षणातून विकास' या विषयावर व्याख्यानही संपन्न झाले. या कार्यक्रमास शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री. योगेश कडुस्कर तसेच प्र.केंद्र समन्वयक आणि शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या सर्व शाळांमध्ये थोर समाजसुधारक तथा प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती ''महिला शिक्षण दिन'' म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी शिक्षक व विद्यार्थी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक योगदानाविषयी व स्त्री शिक्षणाचे महत्व या विषयांवर गटनिहाय परिसंवादात सहभाग घेतला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते.
Published on : 03-01-2021 09:11:06,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update