महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. अभिजीत बांगर यांनी मंजूर केला सन 2020-21 चा सुधारित व सन 2021-22 चा मूळ लोकाभिमुख अर्थसंकल्प

नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2020-21 चा सुधारित आणि सन 2021 - 22 चा मूळ अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. अभिजीत बांगर यांनी मंजूर केला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त तसेच अंदाजपत्रक निर्मितीत महत्वाची भूमिका असणारे महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार जमा व खर्चाचे अंदाज आरंभीची शिल्लक रु. 2339.62 कोटी व रु. 2369.73 कोटी जमा आणि रु. 3081.93 कोटी खर्चाचे सन 2020-21 चे सुधारित अंदाज, तसेच रु. 1627.42 कोटी आरंभीच्या शिल्लकेसह रु. 4825 कोटी जमा व रु. 4822.30 कोटी खर्चाचे आणि रु.2.70 कोटी शिलकेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2021-22 चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचेही अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निवेदनातील मुद्दे :-
³ मालमत्ताकर :-
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 3,21,696 इतक्या मालमत्ता कर निर्धारीत करण्यात आल्या असून त्यामध्ये निवासी-266143, अनिवासी-50035, औद्योगिक-5518 अशा मालमत्ता आहेत.
थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी यावर्षी "अभय योजना" लागू करण्यात आली आहे. सदर अभय योजने अंतर्गत 15 डिसेंबर-2020 ते 15 फेब्रुवारी 2021 या कालावधीमध्ये मूळ थकीत मालमत्ता कर भरणा करणा-या मालमत्ता धारकांची 75% शास्ती माफ करण्यात आली आहे. 15 फेब्रुवारी 2021 अखेरपर्यत रु.98.75 कोटी एवढा मालमत्ता कर हा अभय योजनेअंतर्गत वसूल करण्यात आलेला आहे.
या अभय योजनेस आता 1 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
मालमत्ताकरधारकांना करभरणा करताना तसेच अभय योजनेचा लाभ घेताना आपली रक्कम भरण्यासाठी महानगरपालिका कार्यालयात येण्याची गरज भासू नये यादृष्टीने "झिरो पब्लिक कॉन्टॅक्ट" या तत्त्वावर ऑनलाईन कर भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर नियमित करभरणा करणाऱ्या लहान खातेदारांना दंडात्मक रक्कमेचा भूर्दंड बसू नये याकरीता सहामाही देयकाची भरणा तारीख मुदतवाढ देऊन आता 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
माहे नोव्हेंबर 2020 अखेर रू. 149.60 कोटी मालमत्ता कराची वसूली करण्यात आलेली आहे व मार्च-2021 अखेर रु. 420.39 कोटी वसूली होईल अशी अपेक्षा आहे. सन 2020-21 या वर्षामध्ये रु. 570 कोटी जमा होईल असा अंदाज आहे. तसेच सन 2021-22 करिता रू. 600 कोटीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.
- स्थानिक संस्था कर:- प्रलंबित कर निर्धारणा व प्रलंबित वसूलीव्दारे उत्पन्न, शासनाचे सहाय्यकअनुदान व मुद्रांक शुल्क अनुदान मिळून एकत्रित सुधारित अंदाज एकूण रू. 1226.00 कोटी अपेक्षित असून सन 2021-22 करिता रू.1401.46 कोटी इतका अपेक्षित आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रात समाविष्ट 30 महसूली गावांपैकी सिडकोच्या अंतिम विकास योजनेत समाविष्ट 29 गावांच्या हद्दीतील क्षेत्राची सुधारीत विकास योजना व उक्त क्षेत्राबाहेरील अडवली-भूतावली या महसूली गावांची नवीन विकास योजना तयार करण्यात येत आहे. त्याबाबतचा इरादा शासन राजपत्रात दि. 15/12/2017 रोजी प्रसिध्द करण्यात आलेला आहे.
तद्नंतर प्रत्यक्ष जमीन वापर सर्व्हेक्षण व जमीन वापर नकाशा तयार करण्यात आला आहे. शहराची पुढील 20 वर्षातील 28 लक्ष एवढी संभाव्य लोकसंख्या विचारात घेऊन आवश्यक जमीन वापर प्रस्तावित करण्यात आला असून पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक आरक्षणाकरीता महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 च्या कलम 31 (5) नुसार पुढील वर्षाची 23.30 लक्ष एवढी संभाव्य लोकसंख्या विचारात घेऊन विकास योजना तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
दि. 02/12/2020 रोजी महाराष्ट्र शासनाने एकत्रिकृत विकास व प्रोत्साहन नियंत्रण नियमावली (UDCPR-2020) लागू केली असून दि. 03/12/2020 पासून ती नियमावली नवी मुंबई महानगरपालिकेसही लागू झाली आहे. या माध्यमातून शहरातील पुनर्विकास प्रकल्पांना गती मिळेल. पुनर्विकास प्रस्तावांच्या मान्यतेमधील प्रलंबितता दूर व्हावी यासाठी याबाबतची प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.
जन सायकल सहभाग प्रणाली (Public Bicycle Sharing System) :- नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पर्यावरणपूरक शहराची संकल्पना राबविण्यासाठी "जन सायकल सहभाग प्रणाली (Public Bicycle Sharing System) व इलेक्ट्रीक बाईक प्रणाली" दि.01 नोव्हेंबर 2018 पासून M/s.YULU BIKES PVT. LTD. या संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत एकूण 92 ठिकाणी सायकल स्टॅण्डसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांकडून या प्रणालीस उत्तम प्रतिसाद प्राप्त होत असून 2,50,620 नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. या सायकलींच्या 8,14,908 राईड्स झाल्या असून 33,00,865 किमी प्रवास झालेला आहे व महत्वाचे म्हणजे यामधून 38,61,07,732 ग्रॅम इतके कार्बन क्रेडीट मिळालेले आहे. जन सायकल सहभाग प्रणालीच्या माध्यमातून सायकलचा वापर करणारे नवी मुंबई हे भारतातील सर्वात जास्त प्रतिसाद देणारे शहर ठरले आहे.
सिडको, एम.आय.डी.सी., शासनाकडून हस्तांतरीत मालमत्ता :- सिडकोकडून विविध नागरी सुविधांचे 554 भूखंड हस्तांतरीत झालेले असून 520 भूखंडांची सिडकोकडे मागणी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे एम.आय.डी.सी. कडून महानगरपालिकेस विविध नागरी सुविधांचे 61 भूखंड हस्तांतरीत झालेले असून 233 भूखंडांची मागणी करण्यात आलेली आहे.
दिव्यांग स्टॉल :- महानगरपालिका क्षेत्रात दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यादृष्टीने 103 दिव्यांगांना अत्यल्प मासिक शुल्क आकारुन जागा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय, अन्य दिव्यांग बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने "प्रतिक्षा यादी" तयार करण्यात आली असून यामध्ये प्राप्त 714 अर्जांच्या अनुषंगाने सिडकोकडे जागेची मागणी करण्यात आलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगांना व्यवसायासाठी 4.5 चौ.मी. क्षेत्रफळावर ठेवता येतील असे किऑस स्वरुपाचे 275 स्टॉल्स (Supply of Pre-fabricated Modular Kiosks) खरेदी करण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
सर्वसमावेशक वाहनतळ धोरण (स्मार्ट पार्कींग पॉलिसी) :- शहरातील पार्किंगची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करीत शहराचा विकास "वाहनपूरक" शहर न होता "नागरिक पूरक" व्हावा यादृष्टीने "स्मार्ट पार्कींग पॉलिसी" तयार करणे तसेच वाहनतळांचे सर्वसमावेशक नियोजन करण्यात येत आहे.
नवीन बांधकाम परवानगी मंजूर करताना वाहनतळ सुविधा असण्यामध्ये कोणतीही सवलत न देता मंजूरी देण्याचे धोरण राबविले जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी रितसर परवाना घेऊनच व्यवसाय करावेत या भूमिकेतून सर्व व्यावसायिकांना नवी मुंबई महानगरपालिका परवाना विभागाच्या कक्षेत आणण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविण्याचे नियोजन आहे. याकरीता उप आयुक्त (कामगार), ठाणे यांचेकडून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील व्यवसाय धारकांची यादी घेण्यात आलेली असून अशा व्यावसायिकांना परवाना कक्षेत आणण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याद्वारे महानगरपालिकेच्या महसूलात वाढ होईल.
³ पाणीपुरवठा :-
महानगरपालिका क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांमधील पाणी वापराचा आढावा घेऊन सर्वांना समान पाणी वितरण करण्याचे नियोजन असून याद्वारे पाण्याच्या अतिरिक्त वापरावर अंकुश राहून पाणी बचत होण्यास मदत होईल.
सन 2020-21 मध्ये रु.100.43 कोटी जमा होतील अशी अपेक्षा आहे व सन 2021-22 मध्ये अंदाजे वसूली रक्कम रु.122.76 कोटीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.
³ प्रशासन :-
कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरीता नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासह इतरही विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी समर्पित भावनेने 24X7 काम केले. या सेवाभावी कामाची जाणीव ठेवून कोव्हीड काळात जे अधिकारी, कर्मचारी कोरोनाबाधित झाले त्यांचा उपचाराचा व त्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार कामावर रुजू होईपर्यंतचा कालावधी हा कर्तव्य कालावधी म्हणून गृहीत धरुन त्यांना त्या कालावधीचे वेतन अदा करणेत आले. त्याचप्रमाणे कोव्हीड विषयक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोव्हीड कामाचा विशेष भत्ता देण्यात आला. याद्वारे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढले.
नवी मुंबई महानगरपालिकेमधील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना सुरक्षा विमा कवच देण्यात आले. त्याचप्रमाणे ज्या कोरोनाबाधीत अधिकारी, कर्मचारी यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला असेल अशा अधिकारी, कर्मचारी यांच्या वारसांना सुरक्षा विमा कवचाचा लाभ देण्यात आला. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या 2 वाहनचालकांच्या वारसांना कामगार कल्याण निधीमधून प्रत्येकी 25 लक्ष सानुग्रह अनुदान अदा करणेत आले. त्याचप्रमाणे उपरोक्त 2 वाहनचालकांच्या वारसांना वैयक्तिक अपघात विमा कवच योजनेअंतर्गत प्रत्येकी रु. 50 लक्ष अदा करणेबाबतचे प्रस्ताव न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी यांचेकडे सादर करण्यात आलेले आहेत. तसेच 1 अभियंता यांच्या वारसास रु. 50 लक्ष विशेष सानुग्रह अनुदान अदा करण्यात आले आहे
महाराष्ट्र शासनातील अधिकारी/कर्मचा-यांप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी- कर्मचारी यांना 7 वा वेतन आयोग दि. 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे 7 वा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्ती वेतन / कुटुंब निवृत्ती वेतनाचे लाभ सुधारित करण्यात आलेले आहेत.
परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत सभासदाचे सेवा कालावधीत 10 वर्षे सेवा होण्यापूर्वी निधन झाल्यास त्यांचे वारसास रु.10 लक्ष सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध संवर्गातील एकूण 174 कर्मचा-यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला / दुसरा लाभ लागू करण्यात आला आहे. तसेच वर्ग-3, वर्ग-4 कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता याद्या, पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना यांसारखे प्रलंबित विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
*****************************************************************************************
l खर्चाच्या बाबी l
कोव्हीड-19 विषाणूच्या जागतिक आपत्तीत आरोग्य सेवेचे मूळचेच असलेले महत्व अधिक प्रकर्षाने जाणवलेले असून यापुढील काळात आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याकडे विशेष लक्ष देणे, कोव्हीड काळात ऑनलाईन शिक्षण पध्दतीचे अधोरेखित झालेले महत्व लक्षात घेऊन त्यादृष्टीने कार्यप्रणाली अंमलात आणून तिचा प्रभावी वापर करणे, पर्यावरणशील शहर निर्मितीकडे विशेष लक्ष देत त्यास अनुरुप उपक्रम, प्रकल्प राबविणे, नागरिकांची कामे अधिक सुलभपणे ऑनलाईन होण्यासाठी ई-गव्हर्नन्स सक्षमीकरण करणे अशा महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देत अपेक्षित उत्पन्नाचा अंदाज घेऊन खर्चाची प्राथमिकता ठरविण्यात आलेली आहे.
³ अभियांत्रिकी :-
रस्ते, पदपथ व गटारे : महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते, पदपथ, गटारे यांची कामे आवश्यकता लक्षात घेऊन करण्यासाठी रु. 588.74 कोटी रक्कमेची भरीव तरतूद करण्यात आली असून त्यामध्ये टी. टी. सी. औदयोगिक क्षेत्रातील उर्वरित रस्त्याचे क्राँक्रिटीकरण करण्याच्या कामांचा समावेश आहे.
उड्डाणपूल : वाहतूक कोंडी टाळून वाहतूक गतीमान होण्यासाठी विविध ठिकाणी नवीन पूल बांधणे या लेखाशीर्षांतर्गत रु. 98.84 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
दिवाबत्ती सुधारणा : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी विद्युत रोषणाई करणे, तसेच जुन्या फिटींग बदलून नवीन एल.ई.डी. फिटींग लावणे इ. कामे प्रस्तावित असून "दिवाबत्ती सुधारणा" लेखाशीर्षांतर्गत रु. 58.89 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
पथसंकेत (सिग्नल) : पामबीच मार्गावरील पथसंकेत (सिग्नल) Synchronize करणे, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पथसंकेत ITMS करणे तसेच विविध ठिकाणी पथसंकेत उभारणे ही कामे प्रस्तावित असून सदर कामासाठी रक्कम रु.14.04 कोटी एवढी तरतूद करण्यात आलेली आहे.
विद्युत / गॅस दाहिनी उभारणे : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रत्येक विभागामध्ये विद्युत / गॅस दाहिनी उभारण्याचे प्रस्तावित आहे. सदर कामाकरीता रु.9.00 कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.
पर्यावरण-ग्रीन हाऊसिंग कन्सेप्ट, सोलार हिटर, वॉटर रि-सायकलिंग : नवी मुंबई शहराचा समावेश Non Attainment City मध्ये करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय शुध्द हवेच्या गुणवत्तेची मानके विहीत मर्यादेत आणण्याकरीता राबविण्यात येणा-या राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रमांतर्गत Non-Attainment city action plan च्या अंमलबजावणीकरीता सदर लेखाशीर्षांतर्गत रु. 50.00 कोटींची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे.
क्रीडासंकुल व मैदाने विकसित करणे : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील युवकांना व मुलांना चांगल्या प्रकारची मैदाने व क्रीडा संकुल उपलब्ध व्हावीत याकरीता भरीव तरतूद करण्यात आली आहे.
³ पाणीपुरवठा :-
मोरबे धरणामुळे जलसमृध्द असलेल्या नवी मुंबई शहराच्या पाणीपुरवठ्याचा दूरगामी विचार करुन पाण्याचे अधिकचे स्त्रोत वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन व आराखडा तयार करण्यात येत आहे.
मोरबे धरणाचे पाणी दिघ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे प्रलंबित काम सुरु झाले असून मे अखेरपर्यंत हे काम पूर्ण होऊन दिघ्यापर्यंत मोरबे धरणाचे पाणी पोहचेल असा प्रयत्न आहे.
उपयोगात आलेल्या पाण्यावर योग्य नियंत्रण असावे यादृष्टीने वापरलेल्या पाण्याचे वॉटर ऑडिट करण्याचे प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे विविध कारणांनी गळती होणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे नियोजन आहे. यामध्ये पाणी चोरी होऊ नये याकरीता खबरदारी घेऊन ती रोखण्यासाठी नियंत्रणात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे.
³ मलनि:स्सारण :-
मूळ गांवठाणामध्ये उर्वरित ठिकाणी तसेच झोपडपट्टी क्षेत्रात मलनि:स्सारण वाहिनी टाकणे, ट्रिटमेंट प्लान्ट बांधणे आणि तेथील मलनि:स्सारण वाहिनी रस्त्यावरील मुख्य मलनि:स्सारण वाहिनीमध्ये जोडणे याकरीता रु. 50.86 कोटी तरतूद करण्यात आलेली आहे.
प्रक्रियायुक्त सांडपाणी पुनर्वापर :- नवी मुंबई शहरातील मलप्रक्रिया केंद्रातील प्रक्रियाकृत सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याकरीता पायाभूत सुविधा निर्माण करुन उद्याने, सार्वजनिक शौचालये, रस्ते दुभाजकांमधील व इतर सुशोभीत जागा यांना पुनर्प्रक्रियायुक्त सांडपाणी पुरविण्याचे नियोजन असून त्याद्वारे पिण्याच्या पाण्याचीही बचत होण्याचा हेतू साध्य होणार आहे.
टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट :-केंद्र /राज्य शासनाच्या अमृत मिशन प्रकल्पांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोपरखैरणे व ऐरोली येथील मलप्रक्रिया केंद्रात प्रत्येकी 20 द.ल.लि. क्षमतेचे टर्शिअरी ट्रीटमेंट (Tertiary Treatment) प्लान्ट बांधण्याचे काम सुरु असून कोपरखैरणे येथील काम 31 मार्च व ऐरोली येथील काम 31 मे पर्यंत पूर्ण होईल असा प्रयत्न आहे.. यामधील पुनर्प्रक्रियायुक्त सांडपाणी टी.टी.सी. औद्योगिक क्षेत्रातील औद्योगिक संस्थांना पुरविण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
सर्व विभागातील पाणी पुरवठा व मलनि:स्सारण व्यवस्थेच्या कंत्राटासाठी Key Performance Indicator (KPI) चे काम सुरु असून, त्या संबंधी डॅशबोर्ड तयार करण्यात आले आहे. त्याचे सातत्याने अद्ययावतीकरण करण्यात येत आहे.
³ पर्यावरण :-
तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील सहाव्या सेलची क्षमता संपुष्टात आली असून सातवा सेल विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
तुर्भे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थळी C&D waste प्रक्रीया प्रकल्प उभारणी व 5 वर्ष देखभाल दुरुस्ती करण्याचे काम सुरु झाले असून यामधून तयार झालेली खडी व रेती ही महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या रस्ते, पदपथ, गटारे बांधकामाकरीता वापरण्याचे प्रयोजन आहे.
पर्यावरण विषयक कामांकरीता अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणे - नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील हवेच्या गुणवत्ता मापनासाठी ऐरोली, कोपरखैरणे, तुर्भे येथील सनियंत्रित हवा गुणवत्ता तपासणी केंद्रे कार्यान्वित करण्यात येत आहेत. पाण्याची गुणवत्ता तपासणी करीता अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्याचे नियोजन आहे.
³ माहिती तंत्रज्ञान / संगणक :-
विविध विभागांच्या दैनंदिन कामाकरिता इंन्टेग्रेटेड इंटरप्राईज सोल्युशन विकसित करणे - संगणकीकरण ही आजच्या युगाची गरज असून नवी मुंबई महानगरपालिकेशी संबंधित नागरिकांची अधिकाधिक कामे ही प्रत्यक्ष कार्यालयात जावे न लागता ऑनलाईन व्हावीत याकरीता ई-गव्हर्नन्सच्या प्रभावी अंमलबजावणीकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. याद्वारे नागरिकांच्या श्रम, मूल्य व वेळेत बचत होणार आहे. याकरीता अंदाजपत्रकात रु. 127.15 कोटी तरतूद करण्यात आलेली आहे.
³ घनकचरा व्यवस्थापन :-
घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनूसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे घरातच ओला व सुका असे वर्गीकरण करणे, महानगरपालिकेच्या कचरा गाड्यांमध्येही तो वेगवेगळा देणे, त्याची घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पापर्यंत स्वतंत्र वाहतूक करणे व घरातील ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट बास्केट वापरुन घरातच खतात रुपांतर करणे अशा प्रकारची कार्यवाही करण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात घरगुती घातक कचरा (Hazardous waste) संकलनाचा नव्याने उपक्रम राबविण्यात येत असून, त्यामध्ये मोठ्या गृहनिर्माण संस्था व इतर ठिकाणावरुन घरगुती घातक कचरा (Hazardous waste) गोळा करण्यासाठी लाल रंगाच्या कचराकुंडयांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. सदर घातक कचऱ्याचे संकलन करुन, त्याची योग्य प्रकारे प्रक्रिया करुन विल्हेवाट लावण्यात येत आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लहान सोसायट्यांनी व सदनिकांमधील नागरिकांनीही खत टोपली वापरुन घरातील ओल्या कचऱ्याचे खतामध्ये रुपांतर करणे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात झोपडपट्टी व गांव-गावठाणांमध्ये Decentralized Composting करण्याचा म्हणजेच सदर विभागातील कचरा गोळा करुन, ओला व सुका कचरा वेगवेगळा करुन, ओल्या कचऱ्याची विल्हेवाट कचरा निर्मितीच्या ठिकाणीच करण्याचा उपक्रम तीन विभागांमध्ये राबविण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. तसेच नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व गांव-गावठाणे व झोपडपट्टी येथे टप्प्याटप्प्याने Decentralized Composting ही योजना अंमलात आणण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात Zero Garbage संकल्पना राबविणे शक्य होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील शाळांमध्ये व आवारात पडलेले छोटे प्लास्टिकचे तुकडे चॉकलेटचे आवरण व इतर प्लास्टिक वस्तू विदयार्थ्यांमार्फत गोळा करुन, "प्लास्टीमॅन" ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
प्लास्टिकमुक्त नवी मुंबई करीता सिंगल युज प्लास्टिक वापरात येणार नाही याबाबत ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध गृहनिर्माण संस्थांमधून जूनी पादत्राणे गोळा करुन, त्यावर प्रक्रिया करुन तयार केलेली नवीन पादत्राणे गरजू मुलांना वाटपाबाबतची "ग्रीनसोल" ही अभिनव संकल्पना अशासकीय संस्थेद्वारे राबविण्यात येत आहे.
दैनंदिन साफसफाई, रस्ते सफाई, कचरा संकलन, वाहतूक व इतर अनुषंगिक खर्च या लेखाशीर्षांतर्गत रु.254.20 कोटी तरतूद करण्यात आलेली आहे.
³ स्वच्छ महाराष्ट्र अभियान :-
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत "स्वच्छ सर्वेक्षण-2020" मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस स्वच्छ शहरांच्या तालिकेमध्ये देशात तिस-या व महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाचा मान लाभला आहे. यावर्षी देशात प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे मानांकन प्राप्त करण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवून 'निश्चय केला - नंबर पहिला' हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून वाटचाल सुरू केलेली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या "स्वच्छ भारत अभियान (नागरी)" अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने देशपातळीवर "स्वच्छ सर्वेक्षण-2018" मध्ये नववा क्रमांक व "स्वच्छ सर्वेक्षण-2019" मध्ये सातवा क्रमांक तसेच सन 2020 मध्ये तिसरा क्रमांक त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सलग प्रथम क्रमांकाचा मान पटकावून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्रदान करुन सन्मानीत करण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला सन 2018 व 2019 करीता रु.30.00 कोटी बक्षिसाची रक्कम मंजूर करण्यात आलेली असून त्यापैकी रु.15.00 कोटी इतक्या रक्कमेचा पहिला हप्ता महानगरपालिकेस प्राप्त झालेला आहे.
हागणदारीमुक्त डबल प्लस (ODF+ +) शहराकडून वॉटर पल्स मानांकनाकडे वाटचाल - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका हागणदारीमुक्त डबल प्लस (ODF++) शहर घोषित करण्यात आले असून यावर्षी त्यापुढील वॉटर प्लस मानांकन मिळविण्याकडे वाटचाल सुरु आहे.
APMC मार्केटमध्ये जमा होणा-या ओल्या कच-यावर प्रक्रिया, निर्माण होणा-या बायो सीएनजीचा एनएमएमटी बसेसकरिता वापर - ए.पी.एम.सी. मार्केट येथून जमा होणारा दैनंदिन सुमारे 60 टन ओला कचरा व इतर ठिकाणाहून जमा होणा-या ओल्या कच-यापासून 150 टन क्षमतेचा बायोमिथीनेशन प्रकल्प उभारणे प्रस्तावित असून त्यामध्ये तयार होणारा बायो सी.एन.जी. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेस करीता उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
स्वच्छ स्पर्धा आयोजन - स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याकरिता त्यांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने स्वच्छ सोसायटी, हॉटेल, हॉस्पिटल, मार्केट, शाळा व शासकीय कार्यालय अशा सहा गटांमध्ये स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
स्वच्छ सर्वेक्षण-2021 अंतर्गत स्वच्छता विषयक जनजागृती व लोकसहभाग उपक्रम - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरात जनजागृतीसाठी विविध प्रकारचे आकर्षक डिझाईन केलेले होर्डिंग, बॅनर्स लावणे, हस्तपत्रके वाटप करणे व चित्रकला स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, लघुपट स्पर्धा, वॉल पेंटींग स्पर्धा आणि जिंगल स्पर्धा आयोजन करण्यात आले. प्रमोशनल कँटर व्हॅनद्वारे तसेच पथनाट्याद्वारे जनजागृती, विविध स्वच्छता मोहिमा, स्वच्छ सर्वेक्षण-2021 बाबत नवी मुंबई महानगरपालिका सेवेतील वाहने व बसेसवर स्टिकर्स लावणे, डिजीटल वॉल पेंटींग करणे, कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधून सिटीजन फिडबॅक बाबत जनजागृती इ. उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महानगरपालिकेमार्फत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर आणि नागरिकांच्या प्रतिसादाकरीता WhatsApp / Facebook / Twiitter / YouTube अशा समाज माध्यमांवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
महानगरपालिकेचा स्वत:चा "स्वच्छ रेडिओ नवी मुंबई" हा इंटरनेट रेडिओ सुरु करण्यात आला आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सेवाभावी संस्थांच्या (NGO) सहकार्यातून बुक बँक, क्लॉथ बँक, बर्तन बँक व शूज बँक सुरु करण्यात आलेल्या आहेत.
शहर सुशोभिकरण - स्वच्छ सर्वेक्षणातील विविध घटकांमध्ये शहर सुशोभिकरण हा एक महत्त्वाचा घटक असून यावर्षी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सौंदर्यीकरणाच्या नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात आल्या. स्वच्छता आणि पर्यावरण रक्षण-संवर्धनाचे संदेश प्रसारित करणाऱ्या आकर्षक रंगचित्रांनी सजलेली भिंतीचित्रे, महत्त्वाच्या चौकातील लक्षवेधी शिल्पाकृती, विद्युत दिपांनी उजळलेले उड्डाणपुल, अंडरपास व विद्युत खांब, स्वच्छ तलाव काठांवर विलोभनीय चित्रे अशा विविध प्रकारे नवी मुंबई शहर लक्षवेधी स्वरुपात सजले. जे.जे. स्कुल ऑफ आर्टस्च्या कल्पक विद्यार्थी कलाकारांनी आगळ्यावेगळ्या कल्पना राबविल्या आणि येथील मूळ आगरी-कोळी संस्कृतीपासून अत्याधुनिक प्रगतीपर्यंतचे विविध कलाप्रकार ठिकठिकाणी दृश्य स्वरुपात साकारले गेले. नवी मुंबई शहराच्या यावर्षी वेगळ्या पध्दतीने बदललेल्या रुपाची नोंद येथील नागरिकांपासून शहराला भेटी देणाऱ्या पर्यटकांपर्यत सर्वांनीच घेतली आहे.
कचरामुक्त शहराचे स्टार रेटींग :- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कचरामुक्त शहरांना स्टार मानांकन देण्यात येते. नवी मुंबई महानगरपालि
Published on : 18-02-2021 10:41:16,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update