महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने दिवंगत डॉ. वैभव झुंजारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

नवी मुंबई महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव वसंत झुंजारे यांचे दि. 16 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वर दुर्देवीरित्या अपघाती दु:खद निधन झाले. त्यांच्यासमवेत त्यांच्या मातोश्री सौ. उषा वसंत झुंजारे, पत्नी सौ. वैशाली वैभव झुंजारे व कन्या कु. श्रिया वैभव झुंजारे यांचेही अपघातामध्ये दु:खद निधन झाले. त्यांस महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या ॲम्फी थिएटर येथे भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे तसेच प्रशासन उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांच्या समवेत इतर सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी त्याचप्रमाणे माजी नगरसेवक श्री. दशरथ भगत, श्री. संतोष शेट्टी व श्री. रविंद्र सावंत उपस्थित होते.
Published on : 25-02-2021 12:42:53,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update