आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्याकडून बेलापूर विभागात स्वच्छता पाहणी


शहर स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष देण्याच्या दृष्टीने व स्वच्छता कामांना गती लाभण्याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर विविध विभागांना भेटी देत असून ठिकठिकाणच्या स्वच्छता कामांची प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत.
आज त्यांनी बेलापूर विभागातील बेलापूरगांव, शाहबाज गांव, आग्रोळी गांव, सेक्टर 11, सेक्टर 1 ते 4, सेक्टर 8, 8 ए, 8 बी, सेक्टर 9, संभाजी नगर, रमाबाई आंबेडकर नगर, राजीव गांधी स्टेडीयम तसेच नेरुळ विभागातील शिरवणे गांव, जुईनगर व सारसोळेगांव परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रशासन व परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार उपस्थित होते.
या प्रत्यक्ष पाहणीमध्ये त्यांनी तलाव, नाले, शौचालय स्वच्छतेची पाहणी करीत महत्वाच्या सूचना केल्या. तसेच दैनंदिन स्वच्छता अधिक काटेकोरपणे करण्याचे निर्देश दिले.
Published on : 15-03-2021 12:57:04,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update