*लसीकरणाबाबत जाहीर आवाहन*
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत 1 लाख 65 हजार 480 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून दररोज साधारणत: 7 हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. दि. 17 एप्रिल 2021 रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वाशी, ऐरोली व नेरुळ ही सार्वजनिक रुग्णालये तसेच तुर्भे येथील माता बाल रुग्णालय आणि ईएसआयएस हॉस्पिटल सेक्टर 5 वाशी येथील जम्बो लसीकरण केंद्र याठिकाणी लसीकरण सुरु असणार आहे. या केंद्रांवर कोव्हीशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस सुरु राहणार असून कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस घेता येणार आहे.
याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेच्या सीबीडी, बेलापूर, सेक्टर 48 नेरुळ, करावे, कुकशेत, शिरवणे, तुर्भे, पावणे, इंदिरानगर, जुहूगांव, वाशीगांव सेक्टर 2 वाशी, खैरणे, घणसोली, राबाडा, कातकरीपाडा, ऐरोली, चिंचपाडा, दिघा, इलठणपाडा या नागरी आरोग्य केंद्रांमध्ये कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस घेता येणार आहे.
तरी नवी मुंबईकर नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 16-04-2021 16:07:24,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update