यादवनगर येथील शौचालयासाठी राखीव भूखंडावरील अनधिकृत झोपड्यांवर निष्कासन कारवाई
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका क्षेत्रातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे यावर धडक कारवाई करण्यात येत असून अतिक्रमण विभागामार्फत जी विभाग ऐरोली कार्यक्षेत्रातील प्रभाग क्र. 06, यादवनगर जयभवानी नगर येथे भू.क्र. टी-22 व टी-23 शौचालयासाठी राखीव असलेल्या भूखंडावरील अतिक्रमण हटविण्यात आले.
टीटीसी औद्योगिक क्षेत्रामध्ये शौचालयाच्या प्रयोजनासाठी भू.क्र. टी-22 व टी-23 महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळ कडून दि.16 सप्टेंबर 2019 रोजी सीमांकन व करारनामा करुन महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्यात आलेला आहे. याठिकाणी 11 मीटर x 17 मीटरच्या भूखंडावर एकूण 06 सिमेंट पत्रा शेडच्या झोपडया उभारण्यात आलेल्या होत्या. हे अतिक्रमण हटविण्याची कारवाई ऐरोली विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. मिताली संचेती यांच्या नियंत्रणाखाली, अतिक्रमण विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. राकेश डी. निमेष, राबाडा एमआयडीसी पोलिस ठाणे यांचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री. गिते व त्यांचे अधिपत्याखालील पोलिस अधिकारी / कर्मचारी, अतिक्रमण पोलिस पथक, जी विभागातील अधिकारी / कर्मचारी यांचे उपस्थितीत करण्यात आली. यापुढील काळतही अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण यावर अशा प्रकारच्या धडक कारवाया केल्या जाणार आहेत.
Published on : 03-06-2021 15:56:59,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update