नवी मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा विभागामार्फत जाहीर आवाहन
बुधवार दिनांक 23 जून 2021 रोजी मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार असून त्यामुळे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापुर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागात बुधवार दिनांक 23 जून 2021 रोजी पाणी पुरवठा संध्याकाळी होणार नाही.
तसेच या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे व खारघर नोडमधील नवी मुंबई महानगरपालिकेकडून होणारा पाणी पुरवठा देखील बंद राहील. त्याचप्रमाणे गुरुवार दिनांक 24 जून 2021 रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, याची कृपया नोंद घ्यावी.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 22-06-2021 12:43:23,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update