ऐरोली विभागातील अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली अंतर्गत सेक्टर 02, ऐरोली येथील घर क्र. ई-406, ई-407, ई-408, डी-37 व सेक्टर 03, घर क्र. एच-214 येथे तळमजला अधिक एक मजली इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु करण्यात आले होते.
सदर अनधिकृत बांधकामांस ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते.परंतू त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवले होते.
सदर अनधिकृत बांधकामावर ऐरोली विभागामार्फत तोडक मोहीमेचेê आयोजन करण्यात येऊन करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहीमेसाठी 03 मजूर, 01 गॅस कटर, 02 इलेक्ट्रीक हॅमर या साधनांसह जी विभाग ऐरोली येथील अधिकारी व कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस पथक तैनात होते.
Published on : 30-07-2021 15:31:08,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update