*कोपरखैरणे विभागात अतिक्रमण विभागाची अनधिकृत बांधकाम तोडक कारवाई*
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका क्षेत्रातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांघकामे यावर धडक कारवाई करण्यात येत असून कोपरखैरणे विभागामध्ये घर क्र.44, कोपरखैरणे गांव याठिकाणी महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. या अनधिकृत बांधकामास कोपरखैरणे विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती, परंतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.
या अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करून करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, नमुंमपा पोलीस पथक, 7 मजूर, 01 गॅस कटर, 02 ब्रेकर, 1 पीकअप व्हॅन तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस पथक तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 01-09-2021 15:01:47,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update