*कोव्हीड नियमाचे उल्लंघन करून रात्री 10 नंतर सुरू असलेल्या 3 बारकडून प्रत्येकी 50 हजार दंड*
कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून नागरिकांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सक्रीय योगदान द्यावे याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केलेल्या आवाहनानुसार प्रयत्न केले जात असताना कोव्हीड नियमांचे उल्लंघन करून सामाजिक आरोग्याला धोका पोहचविणा-या व्यक्ती, आस्थापना यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू व्हावेत यादृष्टीने 3कोव्हीड प्रतिबंधातून मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात आलेली आहे. याकरिता राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियमावलीही जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार रात्री 10 वाजेपर्यंत रेस्टॉरंट खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली असूनही या नियमांचे उल्लंघन करणा-या आणखी 3 रेस्टॉरंट कम बारवर महानगरपालिकेच्या दक्षता पथकांनी कारवाईचा बडगा उगारलेला आहे.
यामध्ये, सेक्टर 11, सीबीडी बेलापूर येथील रेन फॉरेस्ट रेस्टो बार हा रात्री 10 नंतरही सुरू ठेवून कोव्हीड नियमांचे उल्लंघन केल्याने महानगरपालिकेच्या दक्षता पथकाने त्यांच्याकडून रू. 50 हजार दंडात्मक रक्कमेची वसूली केलेली आहे. तशाच प्रकारे सेक्टर 15, सीबीडी बेलापूर येथील मनिषा बार अँड रेस्टॉरंट यांचेकडूनही 10 नंतर बार सुरू ठेवल्याने 50 हजार रक्कमेचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे सेक्टर 15 कोपरखैरणे येथील मेट्रो बार यांनीही बार रात्री 10 नंतरही बंद न केल्याने त्यांच्याकडून महानगरपालिकेच्या दक्षता पथकांनी 50 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे.
या सर्व दंडात्मक रक्कमा धनादेश स्वरूपात घेण्यात आलेल्या असून यापुढील काळात दुस-या वेळेस नियमाचे उल्लंघन झाल्यास सदर आस्थापना 7 दिवसांकरिता बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल व तिस-या वेळेस नियमांचे उल्लंघन करण्यात आल्यास कोरोना महामारीची अधिसूचना संपुष्टात येईपर्यत सदर आस्थापना बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल अशा सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत.
Published on : 23-09-2021 12:46:50,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update