*ऐरोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई*
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली अंतर्गत सेक्टर 20, ऐरोली गांव येथील घर क्र. 818 येथे जोत्याचे व सेक्टर 09, घर क्र. 51 येथे जी + 4 मजली इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. या अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवेले होते.
सदर अनधिकृत बांधकामावर ऐरोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी 04 मजूर, 01 गॅसकटर, 03 इलेक्ट्रीक हॅमर जी विभाग ऐरोली येथील अधिकारी/कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस पथक तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 07-10-2021 15:00:36,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update