सामुहिक प्रतिज्ञेने दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरूवात

'स्वतंत्र भारत @75 : सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे' ही घोषवाक्य नजरेसमोर ठेवून केंद्र सरकार व राज्य शासनाच्या वतीने 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागांमध्ये तसेच कार्यालयांमध्ये समस्त अधिकारी, कर्मचारी यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची सामुहिक प्रतिज्ञा घेतली. प्रशासन विभागात अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी प्रतिज्ञा घेतली. प्रतिज्ञेनंतर महाराष्ट्राचे मा. राज्यपाल महोदय व मा. मुख्यमंत्री महोदय यांनी सप्ताहानिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले. सप्ताहाचे औचित्य साधून सर्व महापालिका कार्यालयांमध्ये दर्शनी जागी दक्षता जानजागृती सप्ताहाचे फलक प्रदर्शित करण्यात आलेले आहेत.
Published on : 27-10-2021 07:01:01,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update