*पहिल्या तीन दिवसांमध्ये उत्साही प्रतिसादात 15 ते 18 वयोगटातील 27921 मुलांचे कोव्हीड लसीकरण*
*18 वर्षावरील कोव्हीड लसीकरणाचा पहिला डोस नवी मुंबई महानगरपालिकेने एमएआर क्षेत्रात सर्वात आधी पूर्ण केला असून कोव्हीड लसीचे दोन्ही डोस 89 टक्के नागरिकांनी घेतलेले आहेत. 3 जानेवारीपासून केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांच्या मागदर्शनाखाली नियोजनबध्द रितीने सुरुवात करण्यात आली असून पहिल्या तीन दिवसातच 27 हजाराहून अधिक मुलांचे लसीकरण करण्यात आलेले आहे.*
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 18 वर्षावरील 12,58,479 नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतलेला असून 9,83,399 नागरिकांनी म्हणजेच 89 टक्के नागरिकांनी कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. आता महापालिका क्षेत्रातील 206 शाळांमध्ये 15 ते 18 वयोगटातील विदयार्थाच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये 10 जानेवारीपर्यंत दररोज 30 ते 40 शाळांमध्ये 72823 विदयार्थाना करण्यात येणार आहे.
*या लसीकरणाला विदयार्थ्यांचा चागला प्रतिसाद मिळत असून कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन व्हावे व एकाच वेळी गर्दी होऊ नये यादृष्टीने प्रत्येक विदयार्थ्याला शाळेमार्फत देण्यात आलेल्या वेळेनुसार लसीकरण करुन घेतले जात आहे. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी 3 जानेवारी रोजी 9070 विदयार्थ्यांचे, 4 जानेवारी रोजी 10005 विदयार्थ्यांचे तसेच 5 जानेवारी रोजी 8846 विदयार्थ्यांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. अशाप्रकारे 3 दिवसात 27921 विदयार्थ्याना कोव्हीड लसीचा पहिला डोस देऊन संरक्षित करण्यात आलेले आहे.*
15 ते 18 वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस विनामूल्य दिला जात असून सन 2007 व त्यापूर्वी जन्मलेली मुले यासाठी पात्र आहेत. कोव्हीड लसीकरणासाठी शाळेत उपस्थित राहताना मुलांनी त्यांच्या पालकांसह उपस्थित रहावयाचे असून सोबत मोबाईल आणणे आवश्यक आहे. जेणेकरून विदयार्थ्याची लसीकरणासाठी नावनोंदणी प्रक्रिया तसेच ओटीपीबाबतची कार्यवाही करता येईल.
लसीकरणासाठी लाभार्थी मुलांना कोव्हीड 19 आजाराची लागण झाली असल्यास अथवा कोणत्याही प्रकारच्या आजाराने तो रुगणालयात दाखल झाला असल्यास 4 ते 8 आठवडयानंतर कोव्हॅक्सीन लस घेता येईल.
*कोव्हीडची लस पूर्णत: संरक्षित असून पालकांनी आपल्या 15 ते 18 वयोगटातील विदयार्थ्याच्या शाळेमार्फत कळविण्यात आलेल्या दिनांकास व वेळेत त्याठिकाणी उपस्थित राहून आपल्या पाल्याचे मोफत लसीकरण करुन घ्यावे व त्याला आपल्याप्रमाणेच लस संरक्षित करावे तसेच पालकांनीही दोन्ही डोस घ्यावेत. त्याचप्रमाणे लसीकरण झाल्यानंतरही मास्कचा वापर नियमित करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहेय*
Published on : 07-01-2022 07:01:07,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update