बेलापूर विभागातील दिवाळे गावतील अनधिकृत फेरिवाले व शेड्सवर धडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील बेलापूर विभागामार्फत अतिक्रमण मोहिमेतंर्गत दिवाळे गाव येथील मच्छी मार्केट समोरील परिसरात असलेले 6 धाबे व 38 फेरीवाले तसेच विनापरवानगी उभारलेल्या 26 पावसाळी शेड जेसीबी व गॅस कटरच्या सहाय्याने हटविण्यात आले.
तसेच 52 फेरीवाले यांचे विरूध्द कारवाई करून त्यांचे भाजीपाला/फळे व इतर सामान जप्त करून कोपरखैरणे येथील क्षेपणभूमी येथे जमा करण्यात आले.
या धडक मोहिमेसाठी बेलापूर विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, 25 मजूर, 1 मुकादम, 1 पीकअप व्हॅन, 2 जेसीबी, 2 ट्रक, 1 गॅस कटर तसेच अतिक्रमण विभागाकडील मोठे वाहन व अतिक्रमण विभागाकडील पोलिस पथक तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे अनधिकृत फेरीवाला विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 20-01-2022 14:47:49,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update