नवी मुंबई महापालिका मुख्यालयात प्रजासत्ताकदिनी आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस दल व अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते. कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करीत हा ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी आयुक्तांसह सर्व विभागप्रमुखांची राष्ट्रीय पोषाखामध्ये पारंपारिक पध्दतीने फेटे परिधान करून असलेली उपस्थिती लक्षवेधी होती. प्रजासत्ताक दिनानिमित्त महानगरपालिका मुख्यालयाच्या आयकॉनिक इमारतीस तिरंगी रंगात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.
Published on : 27-01-2022 13:53:37,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update