*कोपरखैरणे विभागातील अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई*
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभागांतर्गत घर क्रमांक 650, सेक्टर -18 कोपरखैरणे, घर क्रमांक 651, सेक्टर -18, कोपरखैरणे, घर क्रमांक 652, सेक्टर -18, कोपरखैरणे व घर क्रमांक 649, सेक्टर -18 कोपरखैरणे यांना अनधिकृत बांधकामाबाबत दिनांक 08 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या. सदर बांधकामधारकांनी महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतरित्या बांधकाम चालू केले होते.
या अनधिकृत बांधकामांवर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करून हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, 05 मजूर, 01 गॅस कटर, 02 ब्रेकर व जनरेटर चा वापर करण्यात आला.
यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 15-03-2022 14:25:45,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update