*पावसाळीपूर्व स्थितीचा आढावा घेताना नमुंमपा आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांनी कार्यपूर्ततेसाठी दिली 15 मे डेडलाईन*
कोणतेही संकट सांगून येत नाही, त्यामुळे मागील वर्षी काही झाले नाही असे काहीही गृहीत न धरता आधीपासूनच आवश्यक ती दक्षता घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर द्यावा असे निर्देश देत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सद्यस्थितीत सुरु असलेली कामे पूर्ण करण्यासाठी 15 मे पर्यंतची डेडलाईन दिली.
मान्सून 2022 पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने विविध प्राधिकरणांसोबत आयोजित शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीप्रसंगी समितीचे अध्यक्ष म्हणून आयुक्तांनी नवी मुंबईतील सर्व प्राधिकरणांनी परस्पर समन्वय राखून नियोजन करावे व त्याची योग्य प्रकारेअंमलबजावणी करावी असे सूचित केले.
यामध्ये सध्या सुरु असलेल्या स्थापत्य विषयक कामांची स्थिती जाणून घेत ही कामे 24 तास सुरु ठेवून 15 मे पर्यंत जलद गतीने व कामाची गुणवत्ता राखून कामे पूर्ण करावीत असे निर्देश दिले. त्यातूनही पावसाळी कालावधीत सुरु ठेवणे आवश्यक असलेल्या स्थापत्य कामांच्या ठिकाणी बॅरेकेटींग लावणे व सुरक्षेच्या इतर उपाययोजना करण्याची दक्षता घ्यावी असे सूचित करण्यात आले.
रस्ते खड्डेमुक्त असलेच पाहिजेत याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश देतानाच कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर खड्डा चालणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे दिवाबत्ती व्यवस्थित राहील व विद्युत खांबामुळे कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची खबरदारी घ्यावी, याकरिता प्रत्येक विद्युत खांबाची काळजीपूर्वक पाहणी करावी असे निर्देश त्यांनी दिले. यामध्ये निष्काळजीपणा केल्याचे निदर्शनास आल्यास कंत्राटदारासह संबंधित अधिका-यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल असे आयुक्तांनी स्पष्ट शब्दात आदेश दिले.
पावसाळी कालावधीत खंडीत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासारख्या अत्यावश्यक कारणाशिवाय रस्ता खोदलाच जाऊ नये याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना करतानाच तातडीने रस्ता खोदणे आवश्यक असले तरी त्याची कल्पना संबंधित विभाग अधिकारी यांना देण्याचे आयुक्तांनी एमएसईडीसीच्या अधिकार्यांना सूचित केले व महापालिका अधिकार्यांनीही काम झाल्यानंतर त्वरित रस्ते दुरूस्ती करुन घ्यावी असे निर्देश दिले.
रस्त्यांवर पडलेल्या डेब्रीजमुळे पाणी साचण्याच्या घटना टाळण्यासाठी डेब्रीज उचलण्याच्या सूचना महानगरपालिकेप्रमाणेच सार्वजनिक बांधकाम विभाग व एम.आय.डी.सी. प्राधिकरणाच्या अभियांत्रिकी विभागालाही आयुक्तांमार्फत देण्यात आल्या. कोणत्याही बाबींमुळे नागरिकांना असुविधा होणार नाही याची दक्षता घेण्याचे सूचित करण्यात आले.
बंदिस्त नाले व नैसर्गिक नाले यांची सफाई विहित वेळेत पूर्ण करावी असे घनकचरा व्यवस्थापन विभागास निर्देश देतानाच नालेसफाई सुयोग्य खोलीपर्यंत करण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. सफाईनंतर काठाशी काढून ठेवला जाणारा गाळ थोडासा सुकल्यानंतर लगेच उचलला जावा याविषयी खबरदारी घेण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.
पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे व तो कोणत्याही प्रकारे दूषीत होणार नाही याची काळजी घ्यावी असे सूचित करण्यात आले. त्यातही विशेषत्वाने ज्या दुर्गम कॉरी भागात नळाद्वारे पाणीपुरवठा होत नाही तेथील पाणी नमुन्यांची नियमित तपासणी करण्याचे निर्देशित करण्यात आले.
मलनि:स्सारण वाहिन्यांची विहीत वेळेत सफाई पूर्ण व्हावी तसेच त्यावरील झाकणे सुव्यवस्थित असल्याची खातरजमा करून घ्यावी असे सूचित करण्याप्रमाणेच भरतीच्या काळात पावसाळी पाण्यांच्या गटारावरील झाकणे बॅक वॉटरमुळे उघडली जाणार नाहीत या अनुषंगाने झाकणे बदलण्याची कामे करण्यात आलेली आहेत. तरीही त्यांची बारकाईने पाहणी करावी असे निर्देश देण्यात आले.
याशिवाय होल्डींग पॉंडवरील फ्लॅपगेट दुरुस्ती आणि पंपींग स्टेशन दुरुस्तीची कामे तत्परतेने करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. पाणी साचू शकते अशा सखल भागातील संभाव्य ठिकाणी पुरेशा प्रमाणात पंपींग सुविधा आधीपासूनच उपलब्ध करून ठेवावी तसेच वाशी व बेलापूर येथील पम्पींग स्टेशनमध्ये पम्पस् व जनरेटर बॅकअप ठेवावा असेही सूचित करण्यात आले.
वाहतुक पोलीस विभागामार्फत प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने पावसाळी काळात सिग्नल यंत्रणा नियमित कार्यान्वित राहील याकडे लक्ष द्यावे तसेच स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसींगच्या रंगरंगोटीचीही कामे आपापल्या अखत्यारितील रस्त्यांवर करून घ्यावीत असे तिन्ही प्राधिकरणांना सूचित करण्यात आले. सर्व पथदिवे सुरु राहतील याची खबरदारी घेण्याप्रमाणेच महावितरण कंपनीने उघड्या केबल, डिपीची झाकणे बंद असण्याची खबरदारी घ्यावी व दुरुस्ती करून घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या.
धोकादायक इमारतींची यादी तयार करून ती जाहीर करण्यात यावी असे अतिक्रमण विभागास सूचित करण्यात आले तसेच बांधकाम साईटवर कॉलमसाठी खोदल्या जाणा-या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यास अपघात होण्याचा धोका लक्षात घेऊन खड्डे राहणार नाहीत याविषयी दक्षता घेण्याच्या सूचना नगररचना विभागास देण्यात आल्या. परवाना विभागानेही धोकादायक होर्डींगची पाहणी करून योग्य कार्यवाही तत्परतेने करण्याचे निर्देश देण्यात आले.
पावसाळी कालावधीतील संभाव्य आजार लक्षात घेता महानगरपालिकेकडे आवश्यक औषध साठा उपलब्ध करून ठेवणे तसेच संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आणि व्यापक जनजागृती करणेबाबत आयुक्तांनी महत्वाच्या सूचना केल्या. डास उत्पत्ती स्थाने निर्माण होण्याचा धोका असलेली जोखमीची ठिकाणे लक्षात घेऊन त्याठिकाणी आरोग्य पथकांव्दारे विशेष पाहणी करण्याचे तसेच डास उत्पत्तीस्थाने आढळणाऱ्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले.
महापालिका मुख्यालयात वर्षभर 24 X 7 अहोरात्र सुरु असणा-या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राप्रमाणेच पावसाळी कालावधीत बेलापूर, नेरुळ, वाशी, ऐरोली येथील अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी 25 मे पासून आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावेत तसेच आठही महापालिका विभाग कार्यालयात विभागीय नियंत्रण कक्ष सुरु करून या सर्व ठिकाणी आवश्यक साधनसामुग्री व उपकरणांसह मदत करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे असे आयुक्तांनी सूचित केले. याशिवाय अग्निशमन विभागाकडे असलेल्या रबर बोटी, पाणी उपसा पंप तसेच इतर साहित्य व उपकरणे कार्यान्वित असल्याबाबत तपासणी करून घ्यावी असेही निर्देशित करण्यात आले.
*आपत्ती नियंत्रण कक्षातील दूरध्वनी कोणत्याही परिस्थितीत अनुत्तरित राहणार नाही अशाप्रकारे यंत्रणा कार्यान्वित असली पाहिजे असे निर्देश देतानाच एखादी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याचे त्वरित निराकरण झाले पाहिजे याकडे काटेकोर लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देश .*
रहदारीला अडथळा येणा-या झाडांच्या फांद्यांची आवश्यक तेवढ्याच प्रमाणात छाटणी करावी असे सूचित करतानाच त्याचा हरित कचरा त्वरित उचलण्यासाठी उद्यान व स्वच्छता विभागांनी परस्पर समन्वय राखावा असे आयुक्तांनी निर्देश दिले.
दरड / घनमाती कोसळण्याची संभाव्य ठिकाणे तसेच नैसर्गिक नाल्यांची ठिकाणे येथील झोपड्या / घरे स्थलांतरीत करण्याची दक्षता घ्यावी अशा सूचना विभाग- अधिकारी यांना देण्यात आल्या. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या निवा-याकरीता शाळा व समाजमंदिरांचे विभाग कार्यालयांनी पूर्वनियोजन करावे व त्यांच्याकरीता आवश्यक अन्नधान्य साठा करून ठेवावा अशा छोट्या छोट्या गोष्टींवरील महत्वाच्या सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या.
महापालिका क्षेत्रातील सर्व प्राधिकरणे, संस्था, मंडळे, पोहणा-या व्यक्ती, हॉटेल्स, रुग्णालये, विविध प्रकारचे मदतकार्य करणा-या संस्था व व्यक्ती यांचे संपर्कध्वनी एकत्रित करून त्याची दरवर्षीप्रमाणे माहिती पुस्तिका प्रसिध्द करावी व महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरही त्याला प्रसिध्दी द्यावी असे आयुक्तांनी सूचित केले.
या बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे तसेच महानगरपालिकेचे विभागप्रमुख, विभागांचे सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, वाहतुक पोलीस, सिडको, एम.एम.आर.डी.ए., सार्वजनिक बांधकाम विभाग, एम.आय.डी.सी., एम.टी.एन.एल., ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालय, सुरक्षा व आरोग्य विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, रेल्वे प्रबंधक, ए.पी.एम.सी. मार्केट, महावितरण, रॅपिड ॲक्शन फोर्स, बी.ई.एस.टी., नागरी संरक्षण दल, टी.बी.आय.ए., स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असो., केमिकल ॲण्ड अल्कली इंटस्ट्रीयल सोसा., मच्छिमार संघटना यांचे मुख्य अधिकारी, पदाधिकारी यापैकी काही अधिकारी प्रत्यक्षात तसेच अनेक अधिकारी वेब संवाद प्रणालीव्दारे सहभागी झाले होते. दिली 15 मे डेडलाईन*
कोणतेही संकट सांगून येत नाही, त्यामुळे मागील वर्षी काही झाले नाही असे काहीही गृहीत न धरता आधीपासूनच आवश्यक ती दक्षता घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर द्यावा असे निर्देश देत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सद्यस्थितीत सुरु असलेली कामे पूर्ण करण्यासाठी 15 मे पर्यंतची डेडलाईन दिली.
मान्सून 2022 पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने विविध प्राधिकरणांसोबत आयोजित शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीप्रसंगी समितीचे अध्यक्ष म्हणून आयुक्तांनी नवी मुंबईतील सर्व प्राधिकरणांनी परस्पर समन्वय राखून नियोजन करावे व त्याची योग्य प्रकारेअंमलबजावणी करावी असे सूचित केले.
यामध्ये सध्या सुरु असलेल्या स्थापत्य विषयक कामांची स्थिती जाणून घेत ही कामे 24 तास सुरु ठेवून 15 मे पर्यंत जलद गतीने व कामाची गुणवत्ता राखून कामे पूर्ण करावीत असे निर्देश दिले. त्यातूनही पावसाळी कालावधीत सुरु ठेवणे आवश्यक असलेल्या स्थापत्य कामांच्या ठिकाणी बॅरेकेटींग लावणे व सुरक्षेच्या इतर उपाययोजना करण्याची दक्षता घ्यावी असे सूचित करण्यात आले.
रस्ते खड्डेमुक्त असलेच पाहिजेत याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश देतानाच कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर खड्डा चालणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे दिवाबत्ती व्यवस्थित राहील व विद्युत खांबामुळे कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची खबरदारी घ्यावी, याकरिता प्रत्येक विद्युत खांबाची काळजीपूर्वक पाहणी करावी असे निर्देश त्यांनी दिले. यामध्ये निष्काळजीपणा केल्याचे निदर्शनास आल्यास कंत्राटदारासह संबंधित अधिका-यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल असे आयुक्तांनी स्पष्ट शब्दात आदेश दिले.
पावसाळी कालावधीत खंडीत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासारख्या अत्यावश्यक कारणाशिवाय रस्ता खोदलाच जाऊ नये याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना करतानाच तातडीने रस्ता खोदणे आवश्यक असले तरी त्याची कल्पना संबंधित विभाग अधिकारी यांना देण्याचे आयुक्तांनी एमएसईडीसीच्या अधिकार्यांना सूचित केले व महापालिका अधिकार्यांनीही काम झाल्यानंतर त्वरित रस्ते दुरूस्ती करुन घ्यावी असे निर्देश दिले.
रस्त्यांवर पडलेल्या डेब्रीजमुळे पाणी साचण्याच्या घटना टाळण्यासाठी डेब्रीज उचलण्याच्या सूचना महानगरपालिकेप्रमाणेच सार्वजनिक बांधकाम विभाग व एम.आय.डी.सी. प्राधिकरणाच्या अभियांत्रिकी विभागालाही आयुक्तांमार्फत देण्यात आल्या. कोणत्याही बाबींमुळे नागरिकांना असुविधा होणार नाही याची दक्षता घेण्याचे सूचित करण्यात आले.
बंदिस्त नाले व नैसर्गिक नाले यांची सफाई विहित वेळेत पूर्ण करावी असे घनकचरा व्यवस्थापन विभागास निर्देश देतानाच नालेसफाई सुयोग्य खोलीपर्यंत करण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. सफाईनंतर काठाशी काढून ठेवला जाणारा गाळ थोडासा सुकल्यानंतर लगेच उचलला जावा याविषयी खबरदारी घेण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.
पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे व तो कोणत्याही प्रकारे दूषीत होणार नाही याची काळजी घ्यावी असे सूचित करण्यात आले. त्यातही विशेषत्वाने ज्या दुर्गम कॉरी भागात नळाद्वारे पाणीपुरवठा होत नाही तेथील पाणी नमुन्यांची नियमित तपासणी करण्याचे निर्देशित करण्यात आले.
मलनि:स्सारण वाहिन्यांची विहीत वेळेत सफाई पूर्ण व्हावी तसेच त्यावरील झाकणे सुव्यवस्थित असल्याची खातरजमा करून घ्यावी असे सूचित करण्याप्रमाणेच भरतीच्या काळात पावसाळी पाण्यांच्या गटारावरील झाकणे बॅक वॉटरमुळे उघडली जाणार नाहीत या अनुषंगाने झाकणे बदलण्याची कामे करण्यात आलेली आहेत. तरीही त्यांची बारकाईने पाहणी करावी असे निर्देश देण्यात आले.
याशिवाय होल्डींग पॉंडवरील फ्लॅपगेट दुरुस्ती आणि पंपींग स्टेशन दुरुस्तीची कामे तत्परतेने करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. पाणी साचू शकते अशा सखल भागातील संभाव्य ठिकाणी पुरेशा प्रमाणात पंपींग सुविधा आधीपासूनच उपलब्ध करून ठेवावी तसेच वाशी व बेलापूर येथील पम्पींग स्टेशनमध्ये पम्पस् व जनरेटर बॅकअप ठेवावा असेही सूचित करण्यात आले.
वाहतुक पोलीस विभागामार्फत प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने पावसाळी काळात सिग्नल यंत्रणा नियमित कार्यान्वित राहील याकडे लक्ष द्यावे तसेच स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसींगच्या रंगरंगोटीचीही कामे आपापल्या अखत्यारितील रस्त्यांवर करून घ्यावीत असे तिन्ही प्राधिकरणांना सूचित करण्यात आले. सर्व पथदिवे सुरु राहतील याची खबरदारी घेण्याप्रमाणेच महावितरण कंपनीने उघड्या केबल, डिपीची झाकणे बंद असण्याची खबरदारी घ्यावी व दुरुस्ती करून घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या.
धोकादायक इमारतींची यादी तयार करून ती जाहीर करण्यात यावी असे अतिक्रमण विभागास सूचित करण्यात आले तसेच बांधकाम साईटवर कॉलमसाठी खोदल्या जाणा-या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यास अपघात होण्याचा धोका लक्षात घेऊन खड्डे राहणार नाहीत याविषयी दक्षता घेण्याच्या सूचना नगररचना विभागास देण्यात आल्या. परवाना विभागानेही धोकादायक होर्डींगची पाहणी करून योग्य कार्यवाही तत्परतेने करण्याचे निर्देश देण्यात आले.
पावसाळी कालावधीतील संभाव्य आजार लक्षात घेता महानगरपालिकेकडे आवश्यक औषध साठा उपलब्ध करून ठेवणे तसेच संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आणि व्यापक जनजागृती करणेबाबत आयुक्तांनी महत्वाच्या सूचना केल्या. डास उत्पत्ती स्थाने निर्माण होण्याचा धोका असलेली जोखमीची ठिकाणे लक्षात घेऊन त्याठिकाणी आरोग्य पथकांव्दारे विशेष पाहणी करण्याचे तसेच डास उत्पत्तीस्थाने आढळणाऱ्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले.
महापालिका मुख्यालयात वर्षभर 24 X 7 अहोरात्र सुरु असणा-या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राप्रमाणेच पावसाळी कालावधीत बेलापूर, नेरुळ, वाशी, ऐरोली येथील अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी 25 मे पासून आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावेत तसेच आठही महापालिका विभाग कार्यालयात विभागीय नियंत्रण कक्ष सुरु करून या सर्व ठिकाणी आवश्यक साधनसामुग्री व उपकरणांसह मदत करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे असे आयुक्तांनी सूचित केले. याशिवाय अग्निशमन विभागाकडे असलेल्या रबर बोटी, पाणी उपसा पंप तसेच इतर साहित्य व उपकरणे कार्यान्वित असल्याबाबत तपासणी करून घ्यावी असेही निर्देशित करण्यात आले.
*आपत्ती नियंत्रण कक्षातील दूरध्वनी कोणत्याही परिस्थितीत अनुत्तरित राहणार नाही अशाप्रकारे यंत्रणा कार्यान्वित असली पाहिजे असे निर्देश देतानाच एखादी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याचे त्वरित निराकरण झाले पाहिजे याकडे काटेकोर लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देश .*
रहदारीला अडथळा येणा-या झाडांच्या फांद्यांची आवश्यक तेवढ्याच प्रमाणात छाटणी करावी असे सूचित करतानाच त्याचा हरित कचरा त्वरित उचलण्यासाठी उद्यान व स्वच्छता विभागांनी परस्पर समन्वय राखावा असे आयुक्तांनी निर्देश दिले.
दरड / घनमाती कोसळण्याची संभाव्य ठिकाणे तसेच नैसर्गिक नाल्यांची ठिकाणे येथील झोपड्या / घरे स्थलांतरीत करण्याची दक्षता घ्यावी अशा सूचना विभाग- अधिकारी यांना देण्यात आल्या. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या निवा-याकरीता शाळा व समाजमंदिरांचे विभाग कार्यालयांनी पूर्वनियोजन करावे व त्यांच्याकरीता आवश्यक अन्नधान्य साठा करून ठेवावा अशा छोट्या छोट्या गोष्टींवरील महत्वाच्या सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या.
महापालिका क्षेत्रातील सर्व प्राधिकरणे, संस्था, मंडळे, पोहणा-या व्यक्ती, हॉटेल्स, रुग्णालये, विविध प्रकारचे मदतकार्य करणा-या संस्था व व्यक्ती यांचे संपर्कध्वनी एकत्रित करून त्याची दरवर्षीप्रमाणे माहिती पुस्तिका प्रसिध्द करावी व महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरही त्याला प्रसिध्दी द्यावी असे आयुक्तांनी सूचित केले.
या बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे तसेच महानगरपालिकेचे विभागप्रमुख, विभागांचे सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, वाहतुक पोलीस, सिडको, एम.एम.आर.डी.ए., सार्वजनिक बांधकाम विभाग, एम.आय.डी.सी., एम.टी.एन.एल., ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालय, सुरक्षा व आरोग्य विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, रेल्वे प्रबंधक, ए.पी.एम.सी. मार्केट, महावितरण, रॅपिड ॲक्शन फोर्स, बी.ई.एस.टी., नागरी संरक्षण दल, टी.बी.आय.ए., स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असो., केमिकल ॲण्ड अल्कली इंटस्ट्रीयल सोसा., मच्छिमार संघटना यांचे मुख्य अधिकारी, पदाधिकारी यापैकी काही अधिकारी प्रत्यक्षात तसेच अनेक अधिकारी वेब संवाद प्रणालीव्दारे सहभागी झाले होते.
Published on : 19-04-2022 06:32:32,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update