तुर्भे विभागातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई
.jpeg)
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे विभागांतर्गत घर क्र. 137, 138, 141, 146 गणराज बारच्या बाजुला, से. 22, तुर्भेगांव येथे सुमारे 25.00 मी. X 12.50 मी. मोजमापाचे तळमजल्याच्या कॉलमचे R.C.C. अनधिकृत बांधकाम नवी मुंबई महानगपालिकेची कोणतेही पुर्वपरवानगी न घेता सुरु होते.
या अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु, सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरुच होते. या अनधिकृत बांधकामावर तुर्भे विभाग कार्यालयामार्फत तोडक कारवाईच्या मोहिमेचे आयोजन करुन हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे तुर्भे विभागांतर्गत सायन-पनवेल हायवे ब्रीज खाली, सानपाडा, नवी मुंबई येथील बेघर नागरिक / भिकारी देखील हटविण्यात आलेले आहे.
सदर मोहिमेसाठी तुर्भे विभागातील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. तसेच अतिक्रमण निर्मूलन पथकातील पोलीस अधिकारी / अंमलदार देखील तैनात ठेवण्यात आलेले होते.
या मोहिमेकरीता 10 मजूर व 01 जे.सी.बी.यांचा वापर करण्यात आलेला आहे. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई अधिकतीव्र करण्यात येईल.
Published on : 18-07-2022 15:04:07,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update