नेरुळ विभागातील अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागांतर्गत जागृती को. ऑप. हौ. सोसायटी, सेक्टर 23, जुईनगर याठिकाणी महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते. या अनधिकृत बांधकामास बी विभाग कार्यालय, नेरुळ यांचेमार्फत महाराष्ट्र नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 53(1) अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
सदर अनधिकृत बांधकामावर नेरुळ विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी नेरुळ विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, नवी मुंबई महानगरपालिका 10 मजुर, 01 पीकअप व्हॅन, 05 हातोडे, तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 11-08-2022 13:39:01,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update