*बेलापूर विभागातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई*
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अे विभाग बेलापूर अंतर्गत शहाबाजगांव, बेलापूर, नवी मुंबई येथील घर नं. 600/02 प्लिथंचे बांधकाम पूर्ण झालेले असून गाऊंड प्लोअर स्लॅबचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेचे कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते.
या अनधिकृत बांधकामास अे विभाग बेलापूर कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविने आवश्यक होते. परंतू त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
त्यामुळे या अनधिकृत बांधकामावर अे विभाग बेलापूर कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात येऊन हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी अे विभाग कार्यालय बेलापूर मधील अधिकारी / कर्मचारी 12 मजूर, 01 गॅस कटर ,02 इलेक्ट्रीक हॅमर, जेसिबी तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येईल.
Published on : 07-09-2022 15:27:17,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update