तुर्भे विभागातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे विभागाअंतर्गत घर क्र. 0047/02, से. 5, सानपाडा गांव, नवी मुंबई, यांनी विनापरवानगी घर क्र. 0047/02 येथे सुमारे 15.0 मी. x10.00 मी. या मोजमापाचे G + 3 चे R.C.C. बांधकाम सुरु केले होते.
या अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु, सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरुच होते. या अनधिकृत बांधकामावर तुर्भे विभाग कार्यालयामार्फत तोडक कारवाईच्या मोहिमेचे आयोजन करुन हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेले आहे.
या मोहिमेसाठी तुर्भे विभागातील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. तसेच अतिक्रमण निर्मुलन पथकातील पोलीस अधिकारी / अंमलदार देखील तैनात ठेवण्यात आलेले होते.
या मोहिमेकरीता 01 पोकलेन व 01 इलेक्ट्रीक हॅमर यांचा वापर करण्यात आलेला आहे. तसेच यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई अधिकतीव्र करण्यात येईल.
Published on : 12-09-2022 14:57:15,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update