सुरक्षा रक्षक श्री. नितीन केंद्रे यांच्या धाडसाबद्दल विशेष सन्मान
ऐरोली विभागात दिवागाव, सेक्टर-9 येथील स्मशानभूमीसमोरील तलावाठिकाणी 19 ऑक्टोबर रोजी दुपारी तलाव परिसरात फेरफटका मारण्याच्या उद्देशाने आलेल्या तरुणीने कोणाच्यातरी नावाने हाका मारीत तलावात ऊडी मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याठिकाणी कर्तव्यावर कार्यरत असताना सुरक्षा रक्षक श्री नितीन किंद्रे यांनी प्रसंगावधान राखत धाडस दाखवित तलावात उडी घेत तरूणाचे प्राण वाचविले.
अशाप्रकारे आपले कर्तव्य बजाविणा-या व इतरांचे प्राण वाचविण्यासाठी धावून जाणा-या सुरक्षा रक्षक श्री नितीन किंद्रे यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या शुभहस्ते महापालिका मुख्यालयात विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा विभागाच्या उप आयुक्त श्रीम. मंगला माळवे आणि आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत चांगल्या कामाचा गौरव करण्यात आल्याबद्दल सरुक्षा रक्षकांनी समाधान व्यक्त केले.
Published on : 23-11-2022 12:46:49,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update