*दिव्यांग सन्मान किऑक्स वितरित झालेल्या स्टॉल विषयक कागदपत्रांच्या पडताळणीचे वेळापत्रक जाहीर*
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी 330 दिव्यांग अर्जदारांची यादी दि.04 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. या यादीतील दिव्यांग व्यक्तींना सोडतीद्वारे स्टॉल वितरीत करण्याची प्रक्रिया गुरुवार दि.10 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता विष्णुदास भावे नाटगृह, वाशी येथे पार पडलेली आहे.
सदर सोडत प्रक्रियेमध्ये ज्या व्यक्तींना सूचनापत्र देण्यात आलेले आहेत अशा व्यक्तींची मुळ कागदपत्रांची तपासणी दिव्यांग प्रशिक्षण केंद्र (ETC), वाशी येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
अ.क्र.
|
विभाग
|
दिनांक व वेळ
|
1
|
बेलापूर विभाग व दिघा विभाग
|
दिनांक:-28/11/2022 स.10:30 ते साय:- 05:45
|
2
|
नेरूळ विभाग
|
दिनांक:-29/11/2022 स.10:30 ते साय:- 05:45
|
3
|
वाशी विभाग
|
दिनांक:-30/11/2022 स.10:30 ते साय:- 05:45
|
4
|
कोपरखैरणे विभाग
|
दिनांक:-01/12/2022 स.10:30 ते साय:- 05:45
|
5
|
ऐरोली विभाग
|
दिनांक:-02/12/2022 स.10:30 ते साय:- 05:45
|
6
|
घणसोली विभाग
|
दिनांक:-05/12/2022 स.10:30 ते साय:- 05:45
|
7
|
तुर्भे विभाग
|
दिनांक:-06/12/2022 स.10:30 ते साय:- 05:45
|
तरी, वरील वेळापत्रकानुसार नमूद दिनांकास संबंधीत दिव्यांग व्यक्तींनी त्यांचे मुळ कागदपत्रांसह (सूचनापत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, मालमत्ता कर देयक, आधार कार्ड तसेच शिधापत्र) छाननी करिता उपस्थित रहावे असे आवाहन कऱण्यात येत आहे.
Published on : 25-11-2022 13:22:36,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update