दिव्यांगांना स्टॉलसाठी कागदपत्रे सादर करावयाची 19 व 20 डिसेंबरला अखेरची संधी
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करून देणेसाठी "प्रतिक्षा यादी" मा. महापालिका सर्वसाधारण सभा ठराव क्र. 1521, दि.20 डिसेंबर 2019 अन्वये तयार करण्यात आली होती.
प्रतिक्षा यादीवरील दिव्यांगाकडून दि. 02/06/2022 ते दि. 08/07/2022 या कालावधीत हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. ज्या दिव्यांगांची कागदपत्रे अपूर्ण होती ती पुर्तता करणेकरीता नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व दिव्यांगांना पुरेसा अवधी उपलब्ध करून दिला होता.
त्यास अनुसरून, एकूण 714 दिव्यांगाचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कायम वास्तव्य असलेले दिव्यांग-171, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात भाडयाने अथवा नातेवाईकाकडे राहत असलेले दिव्यांग-321, 18 वर्षापेक्षा कमी वय असलेले दिव्यांग-105, 60 वर्षावरील वयोगटातील दिव्यांग-29, दिव्यांग प्रमाणपत्र नसलेले अर्ज-29 व नवी मुंबई महानगरपालिका हद्दीबाहेरील दिव्यांग-65 असे एकुण दिव्यांगाचे 714 अर्ज प्राप्त झाले होते.
प्रतिक्षा यादीवरील नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात भाडयाने अथवा नातेवाईकाकडे राहत असलेले दिव्यांग-321, दिव्यांगाकडून दि. 02/06/2022 ते दि. 08/07/2022 या कालावधीत हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार 18 वर्षापेक्षा कमी यादीमधून कायम स्वरुपी रहिवाशी वय (18 ते 60 मध्ये वर्ग) 31, दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेल्यामुळे कायमस्वरुपी रहिवाशी-02, महानगरपालिका हद्दीबाहेरील रहिवाशी-01, तात्पुरते रहिवशी यादी मधून कायम रहिवाशी मध्ये वर्ग-135 मयत व एकाच कुटुंबातील 05 हरकती व सूचनानंतर कायमस्वरुपीमध्ये वर्ग झालेले 164 व पूर्वीचे 171 मधील मयत व एकाच कुटुंबातील 05 अर्जदार वगळता 166 असे एकुण 330 दिव्यांगाची अंतिम यादी तयार करण्यात आली. सदर यादी दिनांक 03/11/2022 रोजी online व नवी मुंबई महानगरपालिका सर्व विभाग कार्यालयामध्ये प्रसिध्द करण्यात आली अंतिम यादी प्रसिध्दीनंतर स्टॉल/जागा वाटपाची सोडत दि.10/11/2022 रोजी विष्णुदास भावे नाटयगृह, वाशी येथे काढण्यात आली असून लाभार्थी दिव्यांग व्यक्तीस त्याच दिवशी सुचनापत्र देण्यात आलेले आहे.
लाभार्थी दिव्यांग व्यक्तींची मुळ कागदपत्र तपासून प्रत्यक्ष स्टॉल/जागेचा ताबा देण्याच्या दृष्टीने मालमत्ता विभागामार्फत छाननी सुरू आहे. सदरची छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून अद्यापही काही दिव्यांग लाभार्थांनी आपली मुळ कागदपत्र सादर केलेली नाहीत. तरी ज्या दिव्यांग लाभार्थींनी आपली मुळ कागदपत्र सादर केलेली नाही अशा लाभार्थांनी दि. 19/12/2022 व 20/12/2022 रोजी आपली मुळ कागदपत्र अपंग प्रशिक्षण केंद्र (ETC) वाशी येथे सादर करण्याची अंतिम संधी देण्यात येत आहे. विहित मुदतीनंतर कागदपत्र सादर करण्यात आलेल्या लाभार्थींचा विचार केला जाणार नाही. सदर प्रक्रिया चालू असताना कोणी बनावट कागदपत्रे सादर करण्याचा प्रयत्न केल्यास सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सबब, अंतिम यादी विहीत नियमाप्रमाणे प्रसिध्द करण्यात आलेली असून हरकती, सुचना व कागदपत्रे सादर करण्यास पुरेसा अवधी दिलेला असल्यामुळे आता नव्याने कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी आलेले अर्ज स्विकृत करता येणार नाहीत तसेच पुढील जाहिरात प्रसिध्द करेपर्यंत जागा/स्टॉलची मागणी करणारे नविन अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.
Published on : 15-12-2022 13:11:32,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update