*नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना*
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गरीब व गरजू इयत्ता 1 ली ते महाविदयालयात शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण करणे ही योजना ऑनलाईन पध्दतीने दि.21/12/2022 पासुन राबविण्यात येत आहे.
- विधवा / घटस्फोटित महिलांच्या मुलांना तसेच मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
- आर्थिक व दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या इयत्ता 1 ली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
- इयत्ता 1 ली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या शिक्षणासाठी गुणवत्ता प्राप्त मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
- नवी मुंबई क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता 1 ली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
- नवी मुंबई क्षेत्रातील मनपा आस्थापनेवरील सफाई कामगार व कंत्राटी पध्दतीवर असलेल्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
- नवी मुंबई क्षेत्रातील दगडखाण/बांधकाम/रेती/नाका कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
अटी व शर्ती :-
- विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या वार्षिक परिक्षेत किमान 65% गुण किंवा "अ" श्रेणी मध्ये उत्तीर्ण असावा. (आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांकरीता)
- विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या परीक्षेत किमान 60% गुण किंवा "ब" श्रेणी मध्ये उत्तीर्ण असावा. (मागासवर्गीय लाभार्थ्यांकरीता)
- नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश RTE अंतर्गत झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- विदयार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे व आधारकार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे.
- अर्जामध्ये विदयार्थ्यांचे बँक खाते क्रमांक व IFSC code चुकीचा आढळल्यास त्याची सर्वस्वी जवाबदारी लाभार्थ्यांवर राहील.
- लाभार्थी कुटूंबाने या समान कारणांसाठी इतर कोणत्याही शासकीय / अशासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- एका कुटूंबातील फक्त दोन पाल्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल.
- लाभार्थ्यांचे नमुंमपा क्षेत्रात किमान 3 वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे.
उक्त विविध घटकाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती योजना आवश्यक त्या कागदपत्रांसह https:/www.nmmc.gov.in सदर संकेत स्थळावर शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाईन अर्ज भरणे करिता सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यानुसार लाभार्थी स्वत: मोबाईल व्दारे किंवा संगणकावर सदरील अर्ज सादर करू शकतात. कोणत्याही परिस्थित ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
सदर अर्ज भरतेवेळी ज्या लाभार्थ्यास काही अडचणी निर्माण होतात त्यांनी खाली नमुद केलेल्या आपल्या विभागाशी संबधीत समुहसंघटक यांच्या दुरध्वनीवर संपर्क करावा. शिष्यवृत्ती करीता ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 31 जानेवारी 2023 पर्यंत सायंकाळी 6:15 वाजेपर्यत कार्यरत राहील. तदनंतर लाभार्थ्यांना अर्ज सादर करता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. महानगरपालिका क्षेत्रातील गरजू लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
समाजसेवक -
बेलापूर, नेरुळ विभाग - श्री. प्रकाश कांबळे – 9969008088
वाशी, तुर्भे विभाग – श्री. सुंदर परदेशी - 9594841666
कोपरखैरणे, घणसोली विभाग – श्री. दादासाहेब भोसले – 9372106976
ऐरोली, दिघा विभाग - श्री. दशरथ गंभिरे – 9702309054
समुह संघटक -
- बेलापूर विभाग – श्री. मोहन गायकवाड – 8652441101, श्रीम. अनुपमा आरकडे – 8655590465
- नेरुळ विभाग - श्रीम. प्रियंका पाटील – 9082311440, श्री. किरण विश्वासराव – 9819204145, श्रीम. प्रिती दातार – 9004098715
- वाशी विभाग - श्री. संतोष सुपे – 8380987456, श्रीम. निलीमा धोंगडे – 9326540277
- तुर्भे विभाग - श्रीम. स्वप्नाली म्हात्रे – 9082544474, श्री. जिज्ञेश देवरुखकर - 9004182412
- कोपरखैरणे विभाग - श्रीम. स्मिता व्यवहारे – 8689868333, श्री. गजानन चव्हाण – 8888849220, श्रीम. कविता पाटील - 9768484882
- घणसोली विभाग - श्री. संतोष मोरे – 9004098716, श्री. संतोष गावित – 7977170237
- ऐरोली विभाग - श्रीम. प्रतिक्षा हुंडारे – 8898329622, श्री. मनोहर राऊत - 9224641224
- दिघा विभाग - श्री. विजय चव्हाण – 8291452781, श्री. हेमंत परते – 9545362568
Published on : 20-12-2022 12:37:50,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update