महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा ज्योतीचे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात स्वागत
महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने 1 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे- बालेवाडी, पुणे येथे ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2022’ आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेनिमित प्रत्येक जिल्ह्यातून भव्यतम स्वरुपात क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले असून मुंबई विभागातून गेट वे ऑफ इंडिया येथून पुणे येथील स्पर्धा स्थळाकडे प्रस्थान करणा-या क्रीडा ज्योतीचे नवी मुंबईत महानगरपालिका मुख्यालय येथे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड यांनी क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे यांच्या उपस्थितीत स्वागत केले.
याप्रसंगी क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव, लेखा अधिकारी श्री. विजय रांजणे, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे, तेनझींग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार प्राप्त जलतरणपटू श्री. शुभम वनमाळी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जलतरणपटू श्री. गोकुळ कामथ, जलतरणपटू श्रीम. ऋतुजा उदेशी, खो-खो पटू श्री. मनोज पवार आणि खेलो इंडिया स्पर्धेमधील पदक विजेता जलतरणपटू श्री. रुषभ दास तसेच खो-खो खेळातील राष्ट्रीय खेळाडू श्री. गजानन शेंगाळ व श्री. लोकेश गवस, व्हॉलीबॉल राष्ट्रीय प्रशिक्षक श्री. धनंजय वनमाळी, नेरुळ जिमखाना विश्वस्त श्री. श्रीनिवास मुर्ती, श्री. शरद कथुरिया, श्री. किरण स्टॅनली उपस्थित होते. क्रीडा ज्योती समवेत आलेले मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अभय चव्हाण, तालुका क्रीडा अधिकारी श्री. जुबेर शेख आणि इतर सहका-यांचे महानगरपालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
या स्पर्धमध्ये 39 क्रीडा प्रकारांचा समावेश असून 10 हजार 546 खेळाडू, मार्गदर्शक पंच यांचा सहभाग असणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या स्पर्धेतील सहभागी सर्व खेळाडूना क्रीडा ज्योतीचे स्वागत करुन शुभेच्छा देण्यात आल्या असून स्पर्धा यशस्वितेकरिताही नवी मुंबईकर नागरिकांच्या वतीनेही सदिच्छा प्रदान करण्यात आल्या आहेत.
Published on : 30-12-2022 12:49:26,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update