नवी मुंबई महानगरपालिका CBSE शाळांतील नर्सरीच्या वर्गातील प्रवेशासाठी वयोमर्यादा जाहीर
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोपरखैरणे, सेक्टर-11 व नेरूळ, सेकटर-50 या ठिकाणी सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळा सुरु आहेत. या शाळांमध्ये सन 2023-24 साठी नर्सरी वर्गाकरिता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे यांचेकडील दि. 19 जानेवारी 2023 रोजीच्या पत्रानुसार नर्सरी प्रवेशाकरिता 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत जन्म झालेल्या मुलांना म्हणजेच दि. 31 डिसेंबर 2023 रोजीचे किमान वय 3 वर्षे व कमाल वय 4 वर्षे 5 महिने 30 दिवस असलेल्या मुलांना प्रवेश देण्यात येईल.
सदर वयोमर्यादेबाबतच्या सूचनेची संबंधित सर्व पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने कऱण्यात येत आहे.
Published on : 13-03-2023 14:19:46,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update