नमुंमपा पाणी पुरवठा विभागाचे जाहीर आवाहन
नवी मुंबई महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी चिखले येथे पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाकरिता स्थलांतरीत करणे व कळंबोली येथे एक्स्प्रेस वे पुलाखाली दिवा-पनवेल रेल्वे लाईन क्रॉसिंग करुन जलवाहिनी टाकणेसाठी आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. तसेच भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल - दुरुस्तीची व इतर कामे करणे आवश्यक आहे.
त्या अनुषंगाने सोमवार दि. 10 एप्रिल 2023 रोजी, सकाळी 10.00 ते दुस-या दिवशी मंगळवार, दि. 11 एप्रिल 2023 रोजी, सकाळी 10.00 वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातुन होणारा पाणी पुरवठा 24 तासांकरीता बंद (Shut Down) ठेवणे गरजेचे आहे.
त्यामुळे दि. 10 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळचा आणि दि. 11 एप्रिल 2023 रोजी सकाळचा पाणी पुरवठा बंद राहील. तसेच दि. 11 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळचा पाणी पुरवठा टप्प्याटप्प्याने कमी दाबाने सुरू होईल.
त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तसेच कामोठे, खारघर नोडमधील नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, या कालावधीसाठी आवश्यक असलेला पाण्याचा साठा करून ठेवावा. तसेच या कालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे.
********************************************************************************
Navi Mumbai Municipal Corporation
Public Notice
There is a work of shifting of Morbe Main Pipeline at chikhale for Karjat-Panvel Railway line and crossing of Water Supply mainline at Diva-Panvel Railway line below the Express way bridge at Kalamboli as well as Maintenance work of Bhokarpada Water Treatment Plant and Morbe Dam to Digha main pipeline is to be taken up. So there will be shutdown from Bhokarpada water Treatment plant as on from Dt. 10/04/2023 Morning 10.00 am to Dt. 11/04/2023 Morning 10.00 am for 24 hours. Therefore, water supply in Navi Mumbai Municipal Corporation area as well as in Kamothe and Kharghar will remain closed on Monday Dt. 10/04/2023 evening and Tuesday Dt. 11/04/2023 Morning, also water supply will be at low pressure on Tuesday Evening.
Accordingly, the citizens of the Navi Mumbai Municipal Corporation area and Kamothe and Khargahar node are hereby publicly appealed to co-operate with the Navi Mumbai Municipal Corporation by conserving and using water sparingly during this period.
Published on : 06-04-2023 13:44:21,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update