*विद्युत खांबांवर टाकलेल्या अनधिकृत केबल्स् हटविण्याचे संबधित एजन्सींना आवाहन *
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिवाबत्ती खांबांवरून विनापरवानगी विविध प्रकारच्या केबल्स टाकल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे दिवाबत्ती खांब पडण्याचे, खांबावरील ब्रॅकेट व फिटिंगची दिशा बदलण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे निदर्शनास येत असून त्यामुळे अनेकदा अपघात होत आहेत. त्याचप्रमाणे या केबल्समुळे शहर सौंदर्यीकरणालाही मोठ्या प्रमाणावर बाधा पोहचत आहे.
या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत नवी मुंबई महानगरपालिका विद्युत विभागाच्या वतीने महानगरपालिका क्षेत्रातील सर्व केबल ऑपरेटर तसेच इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाईडर यांना सदर केबल त्वरित पुढील 15 दिवसांच्या कालावधीत काढून टाकणेबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत. याबाबतची अंमलबजावणी संबधित केबल ऑपरेटर तसेच इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाईडर यांनी न केल्यास नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सदर केबल्स हटविण्यात येतील व यामुळे नागरिकांना होणा-या गैरसोयीबद्दल संबधित केबल ऑपरेटर, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाईडर जबाबदार असतील असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेले आहे.
Published on : 25-04-2023 15:37:03,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update