नमुंमपा पाणी पुरवठा विभागाचे जाहीर आवाहन
नवी मुंबई महानगरपालिकेची मान्सूनपूर्व पाणी पुरवठा संबंधी आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. तसेच भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची व इतर कामे करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने बुधवार दिनांक 07/06/2023 रोजी सकाळी 10.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातुन होणारा पाणी पुरवठा 12 तासांकरीता बंद (Shut Down) ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे दि. 07/06/2023 रोजीचा संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. तसेच दि. 08/06/2023 रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.
त्याअनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील व कामोठे, खारघर नोड मधील नागरीकांना याव्दारे जाहीर आवाहन करण्यात येते की, या कालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 06-06-2023 12:24:21,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update