नमुंमपाच्या आयुष्मान भव आरोग्य मेळाव्यात 3137 व्यक्तींची आरोग्य तपासणी
भारताच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते आयुष्मान भव मोहीमेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. ही मोहीम दि.17 सप्टेंबर ते दि. 31 डिसेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सदर मोहीमेअंतर्गत विविध आरोग्य उपक्रम राबविण्यात येत असून दर शनिवारी आयुष्मान आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनेही नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्मान भव आरोग्य मेळावा आयोजित करण्यात येत आहे.
दि. 30 सप्टेंबर 2023 रोजी क्षयरोग, कुष्ठरोग व इतर संसर्गजन्य आजार याविषयी नमुंमपाची रुग्णालये व ना.प्रा.आ.केंद्र स्तरावर आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर मेळाव्यामध्ये सफाई मित्र, क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांच्या सहवासितांची, मधुमेह व उच्च रक्तदाब रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणी अंतर्गत एक्सरे तपासणी, रक्तदाब, Blood Sugar, रक्त तपासणी करण्यात आली. तसेच बांधकाम क्षेत्राच्या ठिकाणी आरोग्य कर्मचा-यांमार्फत तपासणी शिबिर आयोजित करुन बांधकाम मजुरांची तपासणी करण्यात आली. सदर आरोग्य मेळाव्यामध्ये सुमारे 3137 व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरांवर आभा कार्डची निर्मिती व अवयव दानाची प्रतिज्ञा घेण्यात आली.
दि.30 सप्टेंबर 2023 रोजीच्या आरोग्य मेळाव्यास नागरिकांचा मोठया प्रमाणावर उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. शनिवार दि. 07 ऑक्टोबर 2023 रोजीच्या आरोग्य मेळाव्यामध्ये सर्व गरोदर मातांची तपासणी करण्यात येणार आहे. दि. 31 डिसेंबर 2023 पर्यंत दर शनिवारी आयोजित करण्यात येणा-या आयुष्मान आरोग्य मेळाव्यास नागरिकांनी असाच मोठया संख्येने प्रतिसाद द्यावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त श्री. रोजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 03-10-2023 14:30:19,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update