कौलआळी घणसोली येथील एक मजल्याचे अनधिकृत बांधकाम संपूर्ण निष्कासित
नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय घणसोली कार्यक्षेत्रातील कौलआळी येथील गजानन मोतीराम केणी (जागामालक) व महम्मद मुमताज अन्सारी (विकासक) यांनी तळमजला + पहिल्या मजल्याचे आरसीससी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरू केले होते.
या अनधिकृत बांधकामांस घणसोली विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवले होते.
सदर अनधिकृत बांधकाम निष्काषित करण्यासाठी नमुंमपा आयुक्त् श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त् डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली, घणसोली विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त् श्री. संजय तायडे व त्यांच्या विभागातील सहका-यांमार्फत पोलीस पथकांच्या सहयोगाने धडक मोहीमेचे आयोजन करण्यात आलेले होते.
त्यानुसार हे अनधिकृत बांधकाम 8 कामगार व पोकलेनच्या साहाय्याने पूर्णत: निष्कासित करण्यात आले असून, सदर अनधिकृत बांधकाम हटविणेपोटी रु. 50 हजार इतक्या रक्कमेची दंडात्मक वसूली करण्यात आलेली आहे. यापुढील काळातही अतिक्रमण विरोधी कारवाया तीव्र करण्यात येणार आहेत.
Published on : 18-10-2023 15:24:44,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update