*17 जूनला 3 रुग्णालयांत 18 वर्षावरील दिव्यांगांकरिता विशेष लसीकऱण सत्राचे आयोजन*
हवामान विभागाच्या वतीने दिनांक 10 ते 12 जून या कालावधीत दिलेल्या अतिवृष्टीच्या इशा-यामुळे 10 जून रोजी घोषीत करण्यात आलेले दिव्यांगांसाठीचे विशेष लसीकरण सत्र दिव्यांगांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून त्यादिवशी रद्द करण्यात येऊन पुढे ढकलण्यात आले होते.
18 ते 44 वर्षावरील दिव्यांगांसाठीचे विशेष लसीकरण सत्र आता गुरुवार दिनांक 17 जून 2021 रोजी आयोजन करण्यात येत आहे. दिव्यांगांकरिता विशेष लसीकरण सत्र सकाळी 9 ते 5 या वेळेत माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय सेक्टर 15 नेरुळ, राजमाता जिजाऊ रुग्णालय सेक्टर 3 ऐरोली व इ.एस.आय.एस. रुग्णालय सेक्टर 5 वाशी अशा 3 ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही लसीकरण केंद्रावर 45 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींना रांग न लावता प्राधान्याने लसीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये 18 वर्षावरील दिव्यांग व्यक्ती कोव्हीड लसीकरणापासून वंचीत राहू नयेत याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक 17 जून 2021 रोजी 18 ते 44 वर्षावरील दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले असून या विशेष लसीकरण सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 15-06-2021 14:59:30,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update