नमुंमपा वर्धापनदिनानिमित्त कर्मचा-यांच्या कॅरम, बुध्दीबळ स्पर्धांना उत्साही प्रतिसाद
नवी मुंबई महानगरपालिकेचा 32 वा वर्धापनदिन 1 जानेवारी 20124 रोजी संपन्न होत असून यानिमित्त अधिकारी, कर्मचारी यांच्या कला, क्रीडा गुणांना वाव देणा-या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात कॅरम, बुध्दीबळ स्पर्धा अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या.
यामध्ये कॅरम स्पर्धेत 132 पुरूष व 82 महिला अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला. तसेच बुध्दीबळ स्पर्धेत 42 पुरूष व 26 महिला अधिकारी, कर्मचारी यांनी उत्स्फुर्त सहभाग घेत या स्पर्धा यशस्वी केल्या. अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या हस्ते स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे, क्रीडा विभागाच्या उपआयुक्त श्रीम. ललिता बाबर उपस्थित होते.
कॅरम स्पर्धेचे परीक्षण सर्वश्री राजेश हडकर, प्रवीण जाधव, गणेश उपरे, रवी जाधव यांनी तसेच बुध्दीबळ स्पर्धेचे परीक्षण सर्वश्री विलास मलुष्टे, मंगेश काठोळे, उमेश जुनघरे, अमित मालगांवकर यांनी केले.
सदर स्पर्धांच्या आयोजनात क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव, प्रशासकीय अधिकारी श्री. रवी जाधव, उपलेखापाल श्रीम, अदिती कुवेसकर, मनिषा ठाकूर, गायत्री चौधरी, स्वाती अमृते, विद्या चव्हाण, कल्पना गोसावी, अश्विनी गवते, संगीता येरम, राम चव्हाण, अभिजीत काटकर, एकनाथ आखोडे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
Published on : 04-01-2024 07:15:41,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update