वाशी मिनी सी शोअर परिसरात विद्यार्थी व नागरिक लोकसहभागातून स्वच्छता मोहीम
‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छताविषयक विविध उपक्रम विभाग पातळीवर राबविण्यात येत असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभागावर भर दिला जात आहे. या अंतर्गत अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांचे नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांनी वाशी विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. सागर मोरे तसेच स्वच्छता अधिकारी श्री.सूर्यकांत म्हात्रे यांच्यासह प्रत्यक्ष सहभागी होत विद्यार्थी व स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या सहयोगाने वाशी विभागात स्वच्छता मोहीम राबविली.
वाशीतील टिळक महाविद्यालय आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामधील एनसीसी व एनएसएस चे विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक यांनी एकत्र येत महानगरपालिकेच्या वाशी विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच स्वच्छतामित्रांसह एकत्र येत जुहूगाव चौपाटी, वाशीतील मिनी सी शोअर, सेक्टर-१० परिसरातील प्लास्टिक कचरा जमा केला तसेच परिसराची स्वच्छता केली. 78 विद्यार्थी व नागरिकांनी महापालिकेच्या कर्मचा-यांसह राबवलिलेल्या या स्वच्छता मोहीमेमध्ये ४० पोती प्लास्टिक कचरा तसेच १५ पोती काचेच्या बाटल्या जमा करण्यात आल्या. याप्रसंगी उपस्थितांनी ‘माझी वसुंधरा’ अभियानातील पर्यावरण जपणूकीची शपथ तसेच ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत कचरा वर्गीकरण आणि प्लास्टिक प्रतिबंधाची शपथ ग्रहण केली.
Published on : 11-06-2024 11:53:10,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update