नवी मुंबई महानगरपालिकेच्या 111 प्रभागांतील मदत कक्षांसह नवी मुंबईत योजनेच्या अंमलबजावणीकरिता एकूण 412 मदत कक्ष कार्यान्वित शनिवार व रविवारीही मदत कक्ष सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत सुरु राहणार
l योजनेचे स्वरूप :-
प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात डिबाटीव्दारे दरमहा रु.1500/- इतकी रक्कम दिली जाईल.
l योजनेचे लाभार्थी :-
महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
l पात्रता :-
१) महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
२) राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
३) किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
४) लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक.
५) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
l आवश्यक कागदपत्रे :-
१) आधार कार्ड (अर्जामध्ये आधारकार्ड वरील नाव नमूद करावे)
२) अधिवास प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला (अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड / मतदार ओळखपत्र/ जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला
३) महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचा जन्म दाखला/ शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/ अधिवास प्रमाणपत्र.
४) उत्पन्न प्रमाणपत्र (रु. २.५० लाखापर्यंत)/ पिवळे/ केशरी रेशनकार्ड
५) अर्जदाराचे हमीपत्र
६) बँक पासबुक (आधार लिंक असलेले)
७) अर्जदाराचा फोटो (स्वतः लाभार्थी महिला उपस्थित असणे आवश्यक)
l अर्ज करण्याची पद्धत :- योजेनचे अर्ज पोर्टल / मोबाइल अॅपद्वारे / सेतु सुविधा केंद्राद्वारे ऑनलाइन भरले जाऊ शकतात.
l अर्ज करण्याची प्रक्रिया :-
१) पात्र महिलेस ऑनलाइन नारीशक्ती दूत अॅपद्वारे अर्ज करता येईल. नारीशक्ती दूत अॅपद्वारे अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे :
https:/play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot
२) ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात / बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी) / ग्रामपंचायत / वॉर्ड / सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
३) वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात / बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी / ग्रामीण / आदिवासी) / सेतू सुविधा केंद्र येथे ऑनलाइन प्रविष्ट केला जाईल व प्रत्येक अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल.
l अर्ज कुठे दाखल करू शकता ? :-
१) पात्र महिला स्वत: ऑनलाइन नारीशक्ती दूत अॅपव्दारे अर्ज करू शकते.
२) नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासह आठही विभाग कार्यालय क्षेत्रात सुरू केलेल्या 111 प्रभागातील मदत कक्षांमध्ये जाऊन अर्ज करता येतील. – मदत कक्षांची यादी पुढील लिंकवर उपलब्ध : https:/www.nmmc.gov.in/navimumbai/-1720784542 तसेच महानगरपालिकेच्या फेसबुक, इन्स्टा व ट्विटर या सोशल मिडायावरही यादी उपलब्ध आहे.
३) महिला व बालविकास विभागाच्या 226 अंगणवाड्यांमध्ये – यादीसाठी लिंक : https:/www.facebook.com/share/p/HCVYXa5shEyW5Nqn/
४) महाराष्ट्र शासनाच्या 83 आपले सरकार केंद्रांमध्येही अर्ज दाखल करता येतील.
l अधिक माहितीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेशी संपर्काकरिता मोबाईल क्रमांक :-
१) 9969008088 किंवा 9702309054 अथवा 9372106976
२) महिला व बालविकास विभागामार्फत जाहीर हेल्पलाईन क्रमांक – 181
l दि. 12 जुलै 2024 च्या शासन निर्णयाव्दारे अंमलबजावणी प्रक्रियेत अधिक सुलभ तरतूदी :-
१) कुटुंबाची व्याख्या - पती, पत्नी व त्यांची अविवाहित मुले / मुली.
२) नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राहय धरण्यात यावे
३) परराज्यात जन्म झालेल्या व महाराष्ट्रात सध्या वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल अशा बाबतीत त्या महिलेच्या पतीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येते. याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड व 15 वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राहय धरण्यात यावे.
४) सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खातेही ग्राहय धरण्यात यावे.
५) योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राहय धरण्यात यावे.
तरी योजनेस पात्र लाभार्थी महिलांनी नारीशक्ती दूत ॲपव्दारे स्वत: अर्ज करावा अथवा महानगरपालिकेने सुरु केलेल्या आपल्या नजिकच्या मदत कक्षाला भेट देऊन अर्ज दाखल करावा आणि शासनाने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 18-07-2024 14:40:20,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update