नेरूळ विभागात सानपाडा सेक्टर 21 येथील होल्डींग पाँड भागातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका बी विभाग नेरूळ कार्यक्षेत्रातील सानपाडा, सेक्टर 21, भूखंड क्र.1 + 2ए, नोड होल्डींग पाँन्डवर अतिक्रमण केल्याबाबत तेथील अनधिकृत बांधकाम धारकांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 53 1(अ) अन्वये नोटीस बजाविण्यात आली होती. त्या नोटीसीची मुदत संपुष्टात येऊन सदर अनधिकृत बांधकाम संबंधितांकडून स्वत:हून हटविण्यात आले नाही.
त्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, नेरूळ विभाग कार्यालयाच्या वतीने धडक कारवाई करीत 23 जुलै 2024 रोजी सानपाडा, सेक्टर 21, भूखंड क्र. 1+2 ए, नोड होल्डींग पाँड याठिकाणी उभारण्यात आलेल्या 7 अनधिकृत गोडाऊनवर निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे. या कावाईच्या माध्यमातून सदर भूखंड मोकळे करण्यात आले आहेत.
सदर कारवाई नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांचे मार्गदर्शनाखाली व नेरूळ विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे यांच्या नियंत्रणाखाली, अतिक्रमण विभागातील अधिकारी-कर्मचारी, सुरक्षारक्षक, स्थानिक पोलीस यांच्या सहयोगाने करण्यात आली. या मोहीमेकरिता 20 मजूर, 1 मुकादम, 1 गॅस कटर, 2 जेसीबी, व 1 डंपर अशाप्रकारे मनुष्यबळ व साधने वापरण्यात आली.
Published on : 24-07-2024 13:01:36,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update