वाशी विभागात अतिधोकादायक इमारतीतील पाणीपुरवठा खंडीत कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका फार्यक्षेत्रातील सी विभाग वाशी कार्यक्षेत्रातील सी-१ (अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्काशीत करणे) या प्रवर्गात घोषित करण्यात आलेल्या इमारतीचे मा. आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांचे आदेशान्वये व उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनानुसार सी विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली पुढील नमूद केलेल्या इमारतींवर खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
१. बी-३ टाईप अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन (बिल्डिंग नं. १ ते १०), से.२ वाशी (पाणी पुरवठा दि. २०/०६/२०२४ रोजी खंडीत केला होता. विद्युत पुरवठा व मलनिःसारण वाहिनी खंडीत करण्यात आला आहे.)
२. मे. नुर को ऑप हो सो लि, प्लॉट नं-१८, सेक्टर-०९ ए, वाशी, नवी मुंबई. (पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.)
३. मे. ऊर्जा को ऑप हो सो लि, प्लॉट नं -६, सेक्टर-१० ए, वाशी, नवी मुंबई. (पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.)
या धडक मोहिमेसाठी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी/कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे अधिकारी/कर्मचारी व स्थानिक पोलिस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते. या धडक मोहिमेसाठी एकूण १० मजुरांचा वापर करण्यात आला. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 30-07-2024 07:45:06,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update