नेरूळ विभागात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागाअंतर्गत श्री. राजेंद्र रामा भगत व अनिल रामा भगत, घर क्र.207/208, लोट्स अपार्टमेन्ट., से-16ए, नेरुळ, नवी मुंबई, यांचे अंदाजे 32.50M" X 27.0M मोजमापाची G + 6 इमारत असून पाचव्या व सहाव्या मजल्यावर विनापरवानगी अनधिकृतरित्या बांधकाम सुरु होते. सदर अनधिकृत बांधकामास नेरुळ विभाग कार्यालयाकडून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 54 अन्वये दि.08/05/2024 रोजी नोटीस बजावण्यात आलेली होती. तथापी नोटीसीची मुदत संपुष्टात येऊनही अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविण्यात आले नाही.
त्यामुळे सदर अनधिकृत बांधकामावर नेरुळ विभाग कार्यालयामार्फत दि.29.07.2024 रोजी डॉ. राहुल गेठे, मा. उपआयुक्त(अतिक्रमण), नमुंमपा यांच्या मार्गदर्शनाखाली व विभाग कार्यालय नेरुळ यांचे मार्फत अनधिकृत बांधकाम निष्कासन मोहिमेचे आयोजन करुन अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले आहे. सदर कारवाई सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे व अतिक्रमण विभागातील कर्मचारी, 15 मजूर, 1 मुकादम, 4 ब्रेकर, 2 गॅसकटर, अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक समवेत सुरक्षारक्षक, नेरुळ स्थानिक पोलीस यांच्या मार्फत करण्यात आली आहे.. यापुढे देखील अशाप्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 30-07-2024 07:56:53,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update