मलेरिया, डेंग्यूला रोखण्यासाठी 3 व 5 ऑगस्ट रोजी विशेष तपासणी शिबीरांचे विविध ठिकाणी आयोजन
è नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राची भौगोलिक रचना, येथील रहिवाशी व स्थलांतरित लोकसंख्या, यामुळे नमुंमपा कार्यक्षेत्र हिवताप, डेंग्यू अशा आजारासाठी संवेदनशील आहे.
è यादृष्टीने आरोग्य विभागामार्फत संपूर्ण महापालिका कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष सर्वेक्षण तसेच साप्ताहिक वेळापत्रकानुसार नियोजित डास अळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण, घरांतर्गत डास उत्पत्ती शोध मोहीम अशा रितीने नियमित स्वरुपात हिवताप, डेंग्यू या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येतात.
è तथापि महापालिका कार्यक्षेत्रातील मलेरिया, डेंग्यूचे प्रमाण रोखण्यासाठी आणखी ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने आरोग्य विभागास देण्यात आलेले असून त्यानुसार महानगरपालिकेच्या सर्व 24 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रात दि. 3 आणि 5 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
è या राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण शिबिरामध्ये सर्व तापाच्या रुग्णांचे रक्तनमुने घेण्यात येणार आहेत तसेच हिवताप, डेंग्यू या आजारांबाबत माहिती देण्यात येणार आहे. या शिबिरांची वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आहे.
è दि. 3 ऑगस्ट 2024 रोजी –
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सीबीडी अंतर्गत रमाबाई नगर, अंगणवाडी समोर,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र करावे अंतर्गत विठ्ठल मंदिर, करावेगाव,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र से-48 अंतर्गत साईबाबा मंदिर, से. ४८ नेरुळ,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरुळ 1 अंतर्गत गांधीनगर झोपडपट्टी, हनुमान मंदिर,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरूळ 2 अंतर्गत हनुमान मंदिर जवळ, नेरूळगांव,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कुकशेत अंतर्गत मासळी मार्केट, सेक्टर-6, सारसोळे गाव,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवणे अंतर्गत पाटील समाजमंदिर, शिरवणेगाव,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सानपाडा अंतर्गत सेक्टर १४, शिवमंदिर, सानपाडा,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तुर्भे अंतर्गत साईबाबा मंदिर , सेक्टर-२० , तुर्भे,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र पावणे अंतर्गत श्रमिकनगर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभा मंडप. (खालची झोपडपट्टी),
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र इंदिरानगर अंतर्गत इंदिरानगर, समाजमंदिर,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र जुहुगाव अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.२९, जुहुगाव,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वाशीगाव अंतर्गत मलनि:स्सारण केंद्राजवळील वसाहत, वाशीगांव,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र खैरणे अंतर्गत साईबाबा मंदिर, सेक्टर- 18, कोपरखैरणे,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र महापे अंतर्गत राजधानी हॉटेल से,3 कोपरखैरणे,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र घणसोली अंतर्गत हनुमान मंदिर, घणसोली गाव,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र राबाडा अंतर्गत अंगणवाडी क्रमांक 78, रबाळे गाव,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कातकरीपाडा अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा क्रमांक २, भीमनगर,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ऐरोली अंतर्गत अभिनंदन हॉटेल जवळ, से-4,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचपाडा अंतर्गत चिंचपाडा, अंगणवाडी समाजमंदिर क्र.34,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र दिघा अंतर्गत दिघा तलाव, शिव मंदिर समोर,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र इलठणपाडा अंतर्गत ओमसाई मित्र मंडळ व उत्कर्ष समिती, बालीनगर,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नेासीलनाका अंतर्गत गावदेवी मंदिर, तळवली गाव,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र घणसोली से-4 अंतर्गत हावरे चौक, घणसोली से-04
- अशा सर्व 24 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत शिबीर संपन्न होणार आहे.
è त्याचप्रमाणे दि. 05 ऑगस्ट 2024 रोजी –
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सीबीडी अंतर्गत दिवाळेगाव, अंगणवाडी समोर,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र करावे अंतर्गत डी- मार्ट, सेक्टर 42 नेरुळ,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र से-48 अंतर्गत से.२५, उड्डाण पूल खाली कांचन टॉवर च्या बाजूला,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरुळ 1 अंतर्गत रमेश मेटल क्वारी, अंबाबाई मंदिर,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरूळ 2 अंतर्गत नवयुग मित्र मंडळ,सेक्टर-१०,नेरूळ,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कुकशेत अंतर्गत कोळीवाडा, सेक्टर 16 A नेरुळ,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवणे अंतर्गत मासळी मार्केट, सेक्टर १ ए,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सानपाडा अंतर्गत सेक्टर १०, शिवाजी चौक, जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, सानपाडा,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तुर्भे अंतर्गत माथाडी असोसिएशन ऑफिस, सेक्टर-२१, तुर्भे,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र पावणा अंतर्गत कोपरी गाव, अथर्व डेव्हलपर्स कार्यालय,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र इंदिरानगर अंतर्गत प्लॉट नं. ५५, काच कंपनी, तुर्भे MIDC,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र जुहुगाव अंतर्गत साईबाबा मंदिर, जुहुगाव,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वाशीगाव अंतर्गत नागालॅण्ड झोपडपट्टी, केरळा हाऊस समोर, सेक्टर - 31A, वाशी,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र खैरणे अंतर्गत कोपरखैरणे रेल्वे स्टेशन, सेक्टर- 8ए, कोपरखैरणे,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र महापे अंतर्गत नमुंमपा शाळा क्र 36, कोपरखैरणे गाव,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र घणसोली अंतर्गत गावदेवी चौक, घणसोली गाव,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र राबाडा अंतर्गत अंगणवाडी क्रमांक 77, दिवागाव,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कातकरीपाडा अंतर्गत दिवा नाका, अंगणवाडी,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ऐरोली अंतर्गत ऐरोली नाका,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचपाडा अंतर्गत यादवनगर चर्च, दिघा संजय गांधी नगर (विठ्ठल मंदिर),
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र इलठणपाडा अंतर्गत अंगणवाडी, ठाणे बेलापूर रोड, साठेनगर,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नेासीलनाका अंतर्गत विठ्ठल रुख्मिणी मंदिर, गोठीवली
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र घणसोली से-4 अंतर्गत शिव मंदिर, घणसोली, से-07
- याठिकाणी शिबिरे होणार आहेत.
è नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागमार्फत नियमितपणे साप्ताहिक वेळापत्रकानुसार डास व अळी नाशक फवारणी कार्यक्रम, बंद गटारात रासायनिक धुरीकरण कार्यक्रम, घरांतर्गत डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविण्यात येते, त्यामध्ये डासअळ्या आढळल्यास त्या अळ्या नागरिकांना दाखवून, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येते. प्रत्येक हिवताप, डेंग्यू रुग्णाच्या सभोवतालच्या 100 घरांमध्ये डास अळ्या शोधणे, पावडर फवारणी करणे, तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करुन रक्त नमुने घेणे अशा प्रकारची कार्यवाही करण्यात येते.
è तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत कार्यक्षेत्रात गृहभेटी देऊन प्रत्येक तापाच्या रुग्णाचा रक्त नमुना घेण्यात येतो व मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करण्यात येतात. महानगरपालिकेच्या रुग्णालयात किंवा ना.प्रा.आ केंद्रात येणाऱ्या प्रत्येक तापाच्या रुग्णांचा रक्तनमुना घेऊन उपचार देण्यात येतो.
è अशा नियमित कार्यवाहीसोबत पावसाळी कालावधीत विशेष प्रतिबंधात्मक उपायायोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये शाळेतील मुलांना डास अळ्या दाखवून जनजागृती करण्यात येत आहे, सुरु असलेल्या बांधकाम स्थळांवर विशेष लक्ष देण्यात येत असून, बंद असलेल्या बांधकामांठिकाणी पाण्यामध्ये गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. सणांचे औचित्य साधून जनजागृती करण्यात येत आहेत. ज्यामध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरांमध्ये शिबिरे आयोजित करण्यात आली होती.
è हिवताप, डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागाची आवश्यकता असून नमुंमपा कार्यक्षेत्रातील नागरिकांनी दि. 3 व 5 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या क्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण विशेष शिबिरांचा लाभ घेऊन ताप असल्यास रक्ताची तपासणी करुन घ्यावी तसेच हिवताप / डेंग्यू आजाराबाबत माहिती करून घ्यावी व ती अंमलात आणावी असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 01-08-2024 13:05:43,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update