ऐरोली, वाशी, बेलापूर विभागात अतिक्रमण विरोधी धडक मोहीमा
नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामां विरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ.राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने विविध विभागांत पाडकामाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी-विभाग ऐरोली अंतर्गत सेक्टर-04, ऐरोली येथे घर क्र. बी-196, बी-197व क्यु-92 यांचे आरसीसी इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. सदर अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचनाअधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. सदरचे अनधिकृत बांधकामावर ऐरोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच सदर कारवाई अंतर्गत एकुण 30,000/- दंडात्मक रक्कम वसुल करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सी-विभाग वाशी अंतर्गत वाशी गांव येथे श्रीम. सुमन रामकृष्ण सुतार, घर क्र. 30, वाशी गांव यांचे इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु होते. सदर अनधिकृत बांधकामास वाशी विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हुन हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. सदर अनधिकृत बांधकामावर वाशी विभागामार्फत तोडक मोहिमच आयोजन करुन करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अे-विभाग बेलापूर कार्यालया अंतर्गत करावे गांव नवी मुंबई श्री.संदिप तांडेल, घर क्र-03, से-36, करावेगाव, नवी मुंबई तसेच श्रीम. वत्सलाबाई शंकर तांडेल, सर्व्हे नं – 108/110 करावे येथे नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते. सदर श्री.संदिप तांडेल, घर क्र-03, से-36, करावेगाव, नवी मुंबई अनधिकृत बांधकामास अे-विभाग बेलापूर कार्यालया मार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविने आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. सदर अनधिकृत बांधकामावर बेलापूर विभागा मार्फत तोडक मोहिमच आयोजन करुन करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.
सदर मोहिमेसाठी ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.अशोक अहिरे, कनिष्ठ अभियंता श्री.राज नागर गोजे, बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.शशिकांत तांडेल, कनिष्ठ अभियंता श्री.मयुरेश पवार, वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.सागर मोरे हे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. या धडक मोहिमेसाठी एकूण मजुर, ब्रेकर, इलेक्ट्रिकलहॅमर, पोकलन, पिकअप व जेसीबी यांचा वापर करण्यात आला.
यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 03-08-2024 08:18:38,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update